फलटण दि .२० :
पालकांनी मुलगा व मुलगी मध्ये फरक करू नये दोघांना समान वागणूक द्यावी. महिलांनी उंबरठ्याच्या बाहेर पडायचे दिवस आले आहेत त्यासाठी जे काही करावे लागेल ते करायची माझी तयारी आहे.ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं त्यामध्ये संदिप चोरमले व चोरमले परिवार आहे हे हे माझे मनात निश्चित राहणार आहे. कार्यकर्त्याची जाण असणारा मी माणूस आहे असा कार्यकर्ता मिळण हेही एक भाग्य असत असे गैरव उद्गार श्रीमंत रामराजे यांनी काढले.
युवा उद्योजक संदिप चोरमले व सौ स्वाती संदीप चोरमले यांनी विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त आयोजित सत्कार समारंभ व महिलांसाठी खास न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमात श्रीमंत रामराजे बोलत होते. यावेळी पुढे बोलताना श्रीमंत रामराजे म्हणाले की, काही पालक कुटुंबात शिक्षणाची संधी मुलांना जास्त प्रमाणात देताना पण बघतो व आर्थिक परिस्थिती नसल्याने मुलींचे शिक्षण थांबतात व लग्न करून मोकळे होतात ही सामाजिक परिस्थिती आपल्याला बदलावी लागणार आहे.
पुढे राजकारणात काय होईल काय होणार नाही हे वेगळा विषय आहे कार्यकर्ते जपणं महत्वाच आहे, ज्यांनी आपल्याला मदत केली त्या उपकाराच ओझ आपल्यावर राहणार आहे व त्याची नोंद ठेवण अत्यंत गरजेच आहे. हा आयोजित केलेला सामाजिक कार्यक्रम व कौतुक सोहळा हा माझ्यासाठी अवस्मरणीय राहणार आहे. जशी तुम्ही तुमची मुलं वाढवता तशी आपल्याला झाड वाढवायची असून फलटण शहर व तालुका आपल्याला हिरवागार करायचा आहे असे श्रीमंत रामराजे यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास आमदार दिपकराव चव्हाण, चेअरमन,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प.पू. उपळेकर महाराज देवस्थान समितीच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, तेजसिंह भोसले, यांच्या उपस्थित हा अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न झाला. विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त संदिप चोरमले व चोरमले परिवार यांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
यानंतर महिलांसाठी खास न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी महिलांना मोफत प्रवेश ठेवण्यात आला होता. यावेळी सिनेअभिनेते क्रांती नाना मळेगावकर व स्टार प्रवाह सहकुटुंब सहपरिवार फेम सिने अभिनेत्री साक्षी गांधी (अवनि ) उपस्थित होती यावेळी महिलांसाठी भरपूर बक्षिसे ठेवण्यात आली होती यामध्ये पैठणी साड्या, कुलर, पंखा, मिक्सर, शेगडी यासह प्रत्येक सहभागी महिलेस भेटवस्तू देण्यात आल्या या कार्यक्रमास सुमारे ४ हजार महिलांनी उपस्थिती लावली होती.
Good Job Bro… ❤️👍🤝