मार्च 2022 अखेरचे त्रैमासिक विवरण पत्र ईआर-1 ऑनलाईन सादर करण्याचे आवाहन

 

 सातारा दि.19 : जिल्ह्यातील शासकीय, निमशासकीय  तसेच   खासगी  कार्यालयांनी मार्च 2022 अखेरचे ई आर-1 त्रैमासिक  विवरणपत्र   कौशल्य विकास रोजगार उद्योजकता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर दि.30 एप्रिल 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करावे, असे  आवाहन  कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता विभागाचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.


 

ऑनलाईन ई आर-1 सादर करण्याकरीता आपल्या आस्थापनेचा युजर आयडी व पासवर्ड  कार्यालयामार्फत यापूर्वीच कळविण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता केंद्र,सातारा दूरध्वनी क्र.02162-239938 क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन श्री. पवार यांनी केले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!