चौकट
महिलांसाठी खास न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सिने अभिनेत्री साक्षी गांधी कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण…
फलटण शहरातील महिलांसाठी सिने अभिनेत्री क्रांती नाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमास स्टार प्रवाह सहकुटुंब सहपरिवार फेम सिने अभिनेत्री साक्षी गांधी (अवनि ) कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असून या कार्यक्रमात महिलांसाठी भरपूर बक्षिसांचा वर्षाव होणार असून प्रत्येक सहभागी महिलेस हमखास भेट असू देण्यात येणार असल्याची माहिती सौ स्वाती संदीप चोरमले यांनी दिली असून जास्तीत जास्त महिलांनीं कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन सौ चोरमले यांनी केले आहे.
विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त भव्य सत्कार सोहळा व महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन : संदिप चोरमले
विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त भव्य सत्कार सोहळा व महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दिनांक १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता करण्यात आले असल्याची माहिती युवा उद्योजक संदिप चोरमले यांनी दिली आहे.
या कार्यक्रमासाठी आमदार दिपकराव चव्हाण, फलटण कृषि उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर चेअरमन,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, प.पू. उपळेकर महाराज देवस्थान समितीच्या सचिव श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्या श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीचे सभापती श्रीमंत विश्वजितराजे नाईक निंबाळकर, युवा नेते श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सौ. मिथिलाराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थित हा अमृत महोत्सव कार्यक्रम संपन्न होणार आहे.
विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अमृत महोत्सवी वर्षांनिमित्त महिलांसाठी खास न्यू होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महिलांसाठी मोफत प्रवेश असून सदरचा कार्यक्रम शनिवार दिनांक १६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता मुधोजी क्लब फलटण येथे होणार आहे.