फलटण दि. 14 ( सुरेंद्र फाळके ) :
मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनियर कॉलेज फलटण येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी प्रशालेचे आदरणीय प्राचार्य श्री कोळेकर सर , उपप्राचार्य श्री वेदपाठक सर व माध्यमिक विभागाचे उपमुख्याध्यापक श्री अहिवळे सर यांचे हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले . या जयंतीच्या निमित्ताने सौ राजश्री कदम मॅडम, सौ पुनम कदम काकडे मॅडम व कुमारी काशीद मॅडम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक ,शैक्षणिक, आर्थिक कार्याबद्दल माहिती सांगितली तसेच भारतीय संविधानातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाबद्दल व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या वाचनाचा व्यासंग याबद्दल माहिती सांगितली प्रशालेचे उपप्राचार्य श्री वेदपाठक सर यांनीदेखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भारतीय संविधानाबद्दल चे योगदान हे अत्यंत महत्त्वाचे आहे असे आपल्या भाषणातून सांगितले तसेच महावीर जयंतीनिमित्त महावीरांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले तसेच सौ कदम , काकडे मॅडम यांनी स्त्री शिक्षणा विषयीचे डॉ. आंबेडकरांचे काम एका गीतातून गाऊन व्यक्त केले उपमुख्याध्यापक अहिवळे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले व कुमारी कुंभार मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले त्याचबरोबर त्यांनी मानवतेचा संदेश देणारे गीतही सादर केले या कार्यक्रमासाठी प्रशालेतील स्टाफ सेक्रेटरी श्री ओ. ला. दिवसे सर , लोंढे सर , खरात सर , खान सर ,कांबळे सर , कुमारी निर्मला देशमुख मॅडम व सर्व शिक्षक शिक्षिका वृंद उपस्थित होते.