मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर जयंती साजरी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करताना मुधोजी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज , फलटणचे प्राचार्य बाबासाहेब गंगवणे, उपप्राचार्य फडतरे सर , विकास काकडे सर , नितीन जगताप सर, सौ.कांबळे मॅडम व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी
फलटण दि. १४ : फलटण टुडे
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आजही जगातील मानवतेच्या कल्याणासाठी प्रेरणादायी आहेत असे प्रतिपादन मुधोजी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज फलटण चे प्राचार्य बाबासाहेब गंगवणे यांनी केले मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज फलटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगवान महावीर जयंती च्या कार्यक्रम प्रसंगी प्राचार्य गंगवणे बोलत होते.
यावेळी प्रास्तावीक मुधोजी हायस्कूलचे सांस्कृतिक विभाग (दुपार ) प्रमुख संदिप लोंढे सर यांनी डॉ. बाबासाहे आंबेडकर व भगवान महावीर यांचे थोडक्यात विचार मांडून केले.
याप्रसंगी डॉ. बाबासाहेब यांना विशिष्ट समाजाचे नेते किंवा नेतृत्व न मानता त्यांना एका चौकटीत न ठेवता त्यांच्या कार्याचा जर विचार केला तर त्यांचे कार्य सर्व समावेशक असे होते मग ते हिंन्दू कोडबिल असो वा स्त्री – शिक्षण असो वा त्यांनी त्याकाळी समाजहितासाठी विधीमंडळात उपस्थित केलेल लोकसंख्या वाढीची समस्या जी आपणास आता भेडसावते आहे. त्यांनी राजकीय , सामाजिक कार्यामध्ये आपल्या कर्तृत्वाचा , ज्ञानाच ठसा उमटवला होता. संविधानाच्य माध्यमातून त्यांनी समाज कल्याणाचे कार्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहचवण्याचे व मुलभूत हक्क व अधिकार मिळवून देण्याचे कार्य त्यांनी केले .
भगवान महावीर यांच्या जीवनाविषयी सांगताना “जगा आणि जगू द्या” असा संदेश जगाला देणारे, जैन तत्त्वज्ञानाचे प्रसारक, सत्य व अहिंसेचे पुरस्कर्ते भगवान महावीर हे मानवाच्या कल्याणासाठी व उद्धारासाठी घराबाहेर पडले व त्यांनी लोककल्याणाचे महान कार्य केले . असे मत विकास काकडे सर यांनी या दोन्ही महामानवांच्या जयंती च्या अभिवादन प्रसंगी मांडले .
यावेळी शाळेतील मुलांची भाषणे झाली व त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले.
या प्रसंगी आकर्षन ठरलेली छोटीशी विद्यार्थीनी कु. शर्वरी चेतन बोबडे हीचे डॉ .बाबासाहेबांविषयी विचार तीने परखडपणे मांडले समता, न्याय,बंधुता तसेच डॉ.बाबासाहेबांच्या जीवनात आलेल्या अनेक अडचणीवर मात करूण आपल्या ज्ञानाचा ठसा उमटवण्याचे काम कले . असे मनोगत याप्रसंगी व्यक्त केले .
तसेच या प्रसंगी मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य फडतरे सर, जूनियर सायंटिस्ट नरुटे सर व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्तीत होते .
सांस्कृतिक विभाग (सकाळ ) प्रमुख सौ बुचडे मॅडम यांनी याप्रसंगी आभार मानले .
Post Views: 25