फलटण दि. ११ ( फलटण टुडे ) :
स्त्री-पुरुष समानतेचे जनक महात्मा फुले आहेत त्यांनी पुरुष संस्कृती ला बगल देत स्त्रियांसाठी शिक्षणाची दारे उघडे केले असे प्रतिपादन पूनम कदम यांनी केले. महात्मा जयंती निमित्त मालोजीराजे शेती विद्यालय अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते,यावेळी प्रशालेचे प्राचार्य ज्ञानदेव कोळेकर, उपप्राचार्य संजय वेदपाठक सुनील खरात, मारुती दिवसे सावता शिंदे कविता सावंत अर्चना आवळे राजश्री कदम सौ सोनवलकर उपस्थित होते विद्येविना मती गेली, मती विना गती गेली, गतीविना शूद्र खचले, एवढे अविद्येने केले हे महात्मा फुले यांच्या काव्य पंती चा अर्थ आजच्या काळात लक्ष देतो त्यांनी स्वतःची पत्नी सावित्रीबाई फुले यांचा प्रथम शिक्षण देऊन त्यांनी शिक्षिका केले व असा संदेश दिला की शिक्षण जनमानसात अनन्यसाधारण बदल घडवून आणू शकतो स्त्री शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतला आणि स्त्री शिक्षणाचा पाया रचला गेला येथूनच स्त्री शिक्षणाची दारे खुली झाली या महामानवाने स्त्री-पुरुष समानतेचा पाया रचला गेला असे म्हणता येईल असे मत सौ पूनम कदम काकडे यांनी केले यावेळी प्राचार्य ज्ञानदेव कोळेकर उपप्राचार्य संजय वेदपाठक यांनी महात्मा फुले यांचे पूजन व अभिवादन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री मनोज कदम यांनी मानले