सातारा दि. 5 : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आयोजित व जिल्हा तालीम संघ, सातारा यांच्या सहकार्याने 64 व्या वरिष्ठ राज्यस्तरीय अजिंक्यपद व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा 2021-2022 चे आयोजन श्रीमंत छत्रपती शाहु क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, सहकार, पणन तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह (ग्रामीण ) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते झाले.
उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक, बाळासाहेब लांडगे, साहेबराव पवार, दिपक पवार, विविध संस्थांचे पदाधिकारी यांच्यासह आजी माजी कुस्तीपट्टू उपस्थित होते.
विधान परिषदेचे सभापती श्री. नाईक-निंबाळकर म्हणाले, महाराष्ट्रे केसरी कुस्ती स्पर्धा अंत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते. या कुस्ती स्पर्धेवर ग्रामीण भागातील कुस्ती प्रेमींचे लक्ष राहणार आहे. तरुण वयात मुले कुस्तीचे धडे गिरविण्यासाठी तालमीत येतात आपल्या भविष्याचा विचार न करता कुस्ती खेळाशी निगडीत राहतात. वृद्धकाळात त्यांची प्रकृती चांगली राहिल व त्यांना मदत कशी मिळेल यासाठी शासनाने लक्ष देणे गरजेचे असून तरुण कुस्ती मल्लांचा शासनस्तरावर विचार करण्यात यावा.
आज साताऱ्यात भव्य-दिव्य कुस्ती स्पर्धा आहेत. याचा तरुण मल्ल व माजी मल्लांसह मलाही आनंद होत असून याचा अभिामानही वाटत आहे. 9 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी अंतिम लढत होत आहे. या लढतीसाठी मोठी गर्दी होणार
Proud my Satara
Good Job Mere DOSTTT…❤️👍