बारामती:
शनिवार 02 एप्रिल रोजी गुडी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर मळद मध्ये विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला
बारामती सहकारी बँकेचे चेअरमन सचिन सातव यांच्या शुभहस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी बारामती सहकारी बँकेचे संचालक रणजित धुमाळ व मळद ग्रामपंचायत चे उपसरपंच किरण गावडे,ग्रामसेवक सुनील पवार,ग्रापमचयात सदस्या आशा लोंढे,सौ आटोळे,सुनीता सातव,सारिका पिसाळ,प्रफुल्ल कुमार गावडे,विकास भोसले,युवराज शेंडे आदी मान्यवर उपस्तीत होते.
पुणे जिल्हा परिषद च्या निधी मधून सदर विकास कामे होत आहेत या मध्ये मेखळी रोड ते झगडे घर भूमीगत गटार योजना , भैय्यावस्ती कुंभार घर ते चारी भूमीगत गटार योजना , गोकुळनगर सातव वस्ती ते चारी भूमीगत गटार योजना , आनंतनगर फलटण रोड अंतर्गत रास्ता करणे , निरावागज रोड मारनर ते सांगळे घर रास्ता करणे , मायनर २ ते गावडे वस्ती रास्ता करणे , काका शेंड वस्ती रास्ता करणे , जुनी पोलीस पाटील वस्ती ते लोंढे घर रास्ता करणे , गोकुळनगर किसन ढवाण चारी रास्ता करणे , आनंतनगर फलटण रोड भूमीगत गटार योजना , होले वस्ती ते गावठाण भूमीगत गटार योजना करणे आदी कामाचा या मध्ये समावेश आहे
मळद ग्रामपंचायत चे कार्य कौतुकास्पद असल्याचे सचिन सातव यांनी सांगितले तर आभार उपसरपंच किरण गावडे यांनी मानले
Good Job Bro… ❤️👍