बारामती:
बारामती तालुक्यातील औद्योगिक दृष्ट्या म्हतपूर्ण समजल्या जाणाऱ्या वंजारवाडी ग्रापमचयात च्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषद च्या निधीमधून भिगवण रस्ता ते वनविभाग च्या प्रवेशद्वार पर्यंत असलेल्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार आहेत त्याचा भूमिपूजन समारंभ बुधवार 30 मार्च रोजी वंजारवाडी ग्रामपंचायत च्या सरपंच किरणताई जगताप व उपसरपंच विनोद चौधर यांच्या शुभहस्ते संपन्न झाला या वेळी
ग्रामसेवक निलेश लव्हटे , ग्रामपंचायत सदस्य मोहन चौधर, बबन सावंत, व ग्रामस्थ संतोष चौधर बंडू खोगरे , रणजित जगताप , सचिन चौधर, ग्रामपंचायत कर्मचारी मारूती खोमणे व पिंटू सावंत आदी उपस्तीत होते . ग्रामपंचायत च्या माध्यमातून नागरिकांना सेवा सुविधा देण्यासाठी कटिबद्ध असून नागरिकांनी वेळेवर कर भरणा करावा असेही आवाहन या वेळी ग्रामपंचायत च्या वतीने करण्यात आले .आभार उपसरपंच विनोद चौधर यांनी केले
—————————–