गोखळी:दि.२९ :
नाहाक खर्चाला फाटा देउन धुमाळवाडीत वृक्षारोपणाने वाढदिवस साजरा करण्याचा अनोखा उपक्रम. केक कापून नाहक पैसा वाया घालवण्याऐवजी उत्पन्न देणाऱ्या वृक्षांची लागवड करून वाढदिवस राजकारण विरहित साजरा करण्याचा निर्णय गावातील युवकांनी एकत्रित पणे घेतला. ज्या व्यक्तींचा वाढदिवस आहे त्यांनी एक झाड किंवा त्यापेक्षा जास्त आपल्या ऐपतीप्रमाणे झाडे देऊन गावच्या सार्वजनिक ठिकाणी आणि परिसरात डोंगर माथ्यावर वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला. यातून पुन्हा पैसा वाया जाण्याऐवजी भविष्यात वृक्षारोपण केलेले वृक्ष उत्पादन देण्यास सुरुवात झाल्यापासून आर्थिक उत्पन्न सुरू होईल आणि पर्यावरण संतुलन राखले जाईल . गाव तेथे राजकीय गट असतात मात्र वाढदिवसा सारख्या कार्यक्रमांत राजकारण नअआनता राजकारण विरहित हा अनोखा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला या उपक्रमाची सुरुवात लक्ष्मी माता मंदिर धुमाळवाडी येथे हरीश शिंदे सचिन फरतडे यांच्या वाढदिवसानिमित्त नारळाचे वृक्षारोपण करून करण्यात आली. धुमाळवाडी गावची लोकसंख्या साधारण तीन साडेतीन हजारांच्या आसपास आहे या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.. याप्रसंगी धुमाळवाडी आणि पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.