सातारा दि. 29: उप प्रादेशिक परिहवन कार्यालयातील वाहन निरीक्षक यांचा मोटार वाहनाचे सर्व कामकाज करण्यासाठी सातारा जिल्ह्यामध्ये तालुक्यांच्या ठिकाणी माहे एप्रिल 2022 साठी खालीलप्रमाणे दौरा आयोजित केला आसल्याची माहिती उप प्रादेशिक परिवाहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली.
वाहन निरीक्षक यांचा दौरा पुढील प्रमाणे राहील. महाबळेश्वर, दि. 4 एप्रिल, फलटण दि. 7,18,21,28 एप्रिल, वाई, दि. 6 व 20 एप्रिल, वडूज दि. 5 व 22 एप्रिल, दहिवडी, दि.8 व 29 एप्रिल, खंडाळा दि. 13 व 27 एप्रिल, लोणंद दि.25 एप्रिल, कोरेगांव दि.11 एप्रिल 2022.