सातारा दि. 28 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडील शालांत परीक्षोत्तर (मेट्रीकोत्तर) शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी डीबीटी प्रणालीद्वारे शिष्यवृत्तीच्या रकमा विद्यार्थ्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. या शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना http://mahadbtmahait.gov.in या संकेत स्थळावर सन 2021-22 मधील व नूतनीकरण ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत मुदतवाढ रा जिल्ह्यातील सर्व कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालयांनी मेट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्तीचे अर्ज वरील संकेतस्थळावर ऑनलाइन भरण्याबाबतची कार्यवाही दिनांक 31 मार्च 2022 पर्यंत करावी असे आवाहनही डॉ. सपना घोळवे यांनी केले आहे.