फलटण :
फलटण-जैन सोशल ग्रुप,फलटण च्या वतिने फलटण मधिल जैन समाजातील ८ महिलांचा महिला दिना निमित्त दिपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पंचायत समिती फलटण च्या ब्लाॅक डेव्हलपमेंट आॅफीसर(BDO)तथा प्रशासक अमिता गावडे-पवार मॅडम यांचे शुभहस्ते सर्व महिलांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जैन सोशल ग्रुप च्या ऊपाध्याक्षां सविता दौशी,संगीनी फोरमच्या अध्यांक्षा संगीता दोशी ,जैन सोशल ग्रुपचे ऊपाध्याक्ष अजीतकुमार दोशी ,सचिव श्रीपाल जैन,खजिनदार प्रितम शहा,सह-खजिनदार समिर शहा माजी अध्यक्ष राजेंद्र कोठारी,सचिन शहा,ईव्हेंट चेअरमन अतुल कोठाडिया,संचालक डाॅ.मिलींद दोशी ,डाॅ.रविंद्र दोशी ऊपस्थीत होते.
यावेळी डाॅ.अंजली फडे,स्वप्ना शहा,मनिषा नागांवकर,अर्चना गांधी,अनुभा शहा,मोना गांधी ,वृषाली गांधी ,दिप्ती राजवैद्य याचां शाल, श्रीफळ, मोत्याची माळ व सन्मान पञ देउन सत्कार करण्यात आला.
यावेळी फलटण डाॅक्टर्स असोसिएशन च्या अध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल डाॅ.निनाद भुता याचां तसेच सायकल वरुन नर्मदा परिक्रमा पुर्ण केल्या बद्दल दैनीक सकाळचे कोळकी प्रतीनीधी संजय जामदार याचांही जैन सोशल ग्रुप तर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन बोलताना अमिता गावडे यांनी सत्कार मुर्ती महिलांचे अभिनंदन करुन जैन सोशल ग्रुपच्या ऊपक्रमा बद्दल धन्यवाद दीले.
आधीकाधिक महिलांनी प्रशासकीय सेवेत आले पाहीजे असे ऊपस्थीत महिला व मुलीनां आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात अर्पणा जैन,निना कोठारी,पोर्णिमा शहा यांनी मंगलाचरणाने केली. कार्यक्रमाचे ऊत्कुष्ट असे सुञसंचालन दिप्ती राजवैद्य यांनी केले. सचीव श्रीपाल जैन यांनी प्रास्ताविकात जैन सोशल ग्रुपच्या सामाजीक कार्याचा आढावा सादर केला. या कार्यक्रमासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती.
Post Views: 61