फलटण :
येथील फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित स्व.शीलादेवी शरदकुमार दोशी प्राथमिक विद्यालयाचा विद्यार्थी कु.चारुदेष्ण कृष्णात बोबडे याची सैनिक स्कूल, सातारा मध्ये शैक्षणिक वर्ष सन 2022 – 23 करिता इ.6 वी च्या शिक्षणासाठी निवड झाली आहे.
सदर प्रवेश परिक्षेसाठी चारुदेष्ण यास वर्गशिक्षिका सौ.प्रतिभा साळुंखे, मुख्याध्यापिका सौ.प्रज्ञा काकडे, श्री क्लासेस चे संचालक श्रीकांत साळुंखे, सौ.प्रियांका साळुंखे यांचे मार्गदर्शन लाभले.
चि.चारुदेष्ण याचे या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.