बारामती:
गोजुबावी सावंतवाडी येथील कांतीलाल दिलीप गरगडे यांची महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परिक्षे मध्ये मोटार वाहन निरिक्षक पदी (RTO inspector) निवड झाली आहे.
भटक्या विमुक्त जाती जमाती (c) या कॅटेगिरी मध्ये राज्यात पहिला व जनरल कॅटेगिरी मध्ये राज्यात सहावा येण्याचा मान त्यास मिळाला असून ग्रामस्थानच्या वतीने सत्कार समारंभ चे आयोजन करण्यात आले होते यावेळी वडील,दिलीप गरगडे,आई ताईबाई,भाऊ भारत गरगडे ,बहीण सारिका धालपे,अमोल धालपे आदी कुटूंबीय व निवृत्त सुभेदार तुकाराम गरगडे,पोलिस पाटील नितीन गटकळ, माऊली लांबोते,आनंद घायाळ,दादा लांबोते,दादा गरगडे,रमेश बागडे,संजय गरगडे,नामदेव गरगडे,संजय बागडे व इतर पदाधिकारी उपस्तीत होते
या पदावर न थांबता आणखीन स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासकीय मोठी पदे मिळवण्याचा प्रयत्न राहील व गावकऱ्यांनी केलेला सत्कार कायम ऊर्जा देत राहील असे सत्काराला उत्तर देताना कांतीलाल गरगडे यांनी सांगितले.
आभार पोलीस पाटील नितीन गटकळ यांनी मानले