फलटण दि.12:
महाराष्ट्र राज्य एम. एड; एम.ए. एज्युकेशन पात्र शिक्षकांच्या कृती समितीचा पुणे विभागीय मेळावा फलटण जि. सातारा येथे नुकताच संपन्न झाला. फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दिपकरावजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या विभागीय मेळाव्यात राज्याचे कृती समितीचे अध्यक्ष राजू जाधव,कार्याध्यक्ष विजय जाधव, राज्य उपाध्यक्ष सुनील गोसावी, सचिन कदम विलास लोकरे,कोल्हापूरचे अध्यक्ष,संजय लोंढे, सोलापूरचे अध्यक्ष.अशोक पवार रायगडचे अध्यक्ष बिपीन साळवे,सांगली चे अध्यक्ष अन्नाराव पाटील, सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष शिवाजी माने,कार्यालयीन चिटणीस राजू ढोबळे मंचावर उपस्थित होते.
शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च समजली जाणाऱ्या शिक्षणशास्त्र निष्णात अर्थात एम. एड. आणि एम. ए. एज्युकेशन पदवी प्राप्त पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचा यामध्ये समावेश होता.
यावेळी मेळाव्यात उपस्थितांना संबोधित करताना फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार दिपकरावजी चव्हाण यांनी गुणवत्तेनुसार पदोन्नती या कृती समितीच्या मागणीला पाठिंबा व्यक्त करतानाच विधिमंडळात ठोस पाठपुरावा करण्याचे जाहीर केले. राज्याध्यक्ष राजू जाधव यांनी अध्यक्षीय मनोगतात कृती समिती स्थापनेच्या मागची पार्श्वभूमी,पुढील वाटचाल सांगताना उच्च शैक्षणिक अहर्ता धारकांची न्याय बाजू याचा ऊहापोह केला.
विभागीय अध्यक्ष भीमराव पाटील यांनी प्रास्ताविकातून कृती समितीची संकल्पना स्पष्ट केली. मेळाव्याचे संयोजक तथा सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी मनोगतातून सर्वांचे स्वागत केले. कृती समितीचे संकल्पना समजावून सांगून कृती समितीचे ध्येयधोरणे स्पष्ट केली. सूर्यकांत दडस यांनी सूत्रसंचालन केले. तर तारळकर सर यांनी आभार मानले.
मेळावा यशस्वी करण्यासाठी फलटण मधील धन्यकुमार तारळकर, अरुण कांबळे, नाथा रुपनवर, परमेश्वर नाईकनवरे, नितीन काशीद, स्वाती कांबळे, विद्या शिंदे, तसेच सातारा जिल्हातील कृती समितीची कार्यकारणी व सर्व तालुक्यातील कार्यकारणी यांनी प्रयत्न केले.
…..
शिक्षणशास्त्र निष्णात (एम. एड) ही शिक्षण शास्त्रातील सर्वोच्च शैक्षणिक अहर्ता असून शिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी वर्ग 1, वर्ग 2 ही पदे कार्यरत पात्रताधारक शिक्षकांमधूनच भरावीत.
*- राजू जाधव, राज्याध्यक्ष कृती समिती*
……