दिनांक दि ११ :
१८ फेब्रुवारी रोजी बुध ता.खटाव जिल्हा सातारा येथील श्री .संदेश सातभाई वकील यांच्या श्री. व्यंकटेश मंदिरात श्री.चरेगावकर रावसाहेब भजनी मंडळाचा कार्यक्रम दुपारी तीन ते सहा या वेळेत आयोजित केला होता. यामध्ये अभंग,भजन, भक्तिगीते,गवळण , भारूड सादर करून संगीत सेवा केली.सातभाई परीवाराने सर्वांचे मनःपूर्वक स्वागत केले सदर कार्यक्रमात सौ.मंगल चरेगावकर, चरेगावकर रावसाहेब,.वंदना जोशी .नंदकुमार जोशी,सौ.आशा कुलकर्णी, श्री.विजय कुलकर्णी, अरुण पंचवाघ,सौ.आसावरी गोळे ,श्री.प्रमोद गोळे यांनी गायन सेवा केली.श्री. श्रीकांत देशपांडे यांनी संवादीनीवर व श्री. अनिकेत देशपांडे यांनी तबल्यावर साथ केली.एकनाथी भारूडाने कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली.कार्यकमाचे सुत्रसंचलन श्री. विजय कुलकर्णी यांनी केले.