समाजाचे आरोग्य जपण्यात महीलांचा मोलाचा सहभाग – डॉ. मेधा कुमठेकर

फलटण इंजिनीअरिंग कॉलेज मध्ये जागतिक महिला दिनानिमित्त विविध उपक्रम संपन्न

फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग फलटण येथे जागतिक महिला दिनानिमित्त “महिला सप्ताह” संपन्न झाला.
फलटण दि ८ :
दिनांक २ मार्च ते ८ मार्च या कालावधीत हा महिला सप्ताह आयोजित करण्यात आला होता. महिला सक्षमीकरणासाठी विविध उपक्रम यादरम्यान महाविद्यालयातील विद्यार्थीनी, महिला शिक्षकेतर कर्मचारी व प्राध्यापिका यांच्या साठी राबविण्यात आले.
सप्ताहाच्या पहिल्या दिवशी महिलांचे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम रहावे या उद्देशाने योगा व मेडीटेशन शिबिर घेण्यात आले. या शिबिरास योगशिक्षक राधिका नाळे यांनी मार्गदर्शन केले. विविध योगाचे प्रकार व प्राणायामाचे प्रात्यक्षिक दाखवून महत्व सांगिंतले

दुसऱ्या दिवशी ३ मार्च रोजी महिला सक्षमीकरणाचा अविभाज्य घटक म्हणजे महिलांना त्यांचे हक्क व अधिकार याबाबत अधिक माहिती देण्यासाठी फलटण मधील सुप्रसिद्ध अॅडव्होकेट शिरीन शहा यांचे व्याख्यान आयोजित केले होते. भारतीय संविधानात महिला साठी कोणते कायदे आहेत याबाबत त्यांनी माहिती संगितली

४ मार्च रोजी लायन्स क्लब फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रामुख्याने हिमोग्लोबिन, प्लेटलेट्स, आर.बी.सी., डब्ल्यु.बी.सी. या तपासण्या केल्या गेल्या.

५ मार्च रोजी “शाश्वत उद्यासाठी आजची स्त्री पुरुष समानता” या विषयावर रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.महाविद्यालयातील 30 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला व ही स्पर्धा पहाण्यासाठी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते.

७ मार्च रोजी फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या अखत्यारीतील “निर्भया पथक” यांनी महिलांना समाजामध्ये वावरताना घ्यावयाची काळजी, मोबाईल वापराबाबत घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले स्वसंरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना बाबतची प्रात्यक्षिके घेतली गेले.

८ मार्च रोजी या सप्ताहाची सांगता करताना महिला सक्षमीकरणासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मेधा कुमठेकर यांचे व्याख्यान संपन्न झाले. यामध्ये त्यांनी महीलांनी आपले, कुटुंबाचे व पर्यायाने समाजाचे आरोग्य राखण्यात महत्वाचा वाटा उचलावा जेणेकरून महीला सक्षमीकरणाची गरजच पडणार नाही असे उद्बोधन केले. सुरक्षितता आणि सुव्यवस्था हे दोन निकष, स्त्री जेथे काम करत आहे तेथे पाळले पाहिजेत. एकदा जर घरगुती आणि सामाजिक सुरक्षा स्त्रीला लाभली की ती पुरुषाच्या बरोबरीने पुरुषाएवढेच काम करू शकते. महिला सशक्तीकरण करताना अगदी बाल्यावस्थेत असल्यापासून स्त्रीला स्वतंत्र असल्याची जाणीव आणि तसे शिक्षण दिले गेले पाहिजे. कौटुंबिक आणि आईचे संस्कार याबाबतीत खूप महत्त्वाचे ठरतात. मानसिकदृष्ट्या सक्षम स्त्री कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त करू शकते. तिला कठीण आणि धाडसी कार्य करायला लावणे, शारीरिक कष्टदेखील करायला लावणे गरजेचे आहे. शारीरिक सक्षमता येणे गरजेचे आहे. थोडे सहकार्य पुरुषांनी केले आणि स्त्रीला योग्य सुरक्षित वातावरणात कर्तृत्व सिद्धीस कार्यरत केले तर स्त्रियांनाही योग्य तो सन्मान आणि शक्ती प्राप्त करता येईल. खडतर परिश्रम आणि अढळ आत्मविश्वासाच्या बळावर अनेक अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करून विविध क्षेत्रात कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या सक्षम महिलांनी उपेक्षित महिलांच्या विकासाच्या दृष्टीने प्रयत्नांची दिशा वाळविणे हि खरी आंतरराष्ट्रीय महिला दिनाची प्रेरणा ठरेल असे त्या म्हणाल्या.
आपल्या कुटुंबाच्या पाठीमागे एखादी महिला कशी ठामपणे उभे राहू शकते याबाबतचे प्रेरणादायी उदाहरण महाविद्यालयाचे प्राचार्य श्री मिलिंद नातू यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे आयोजन अंतर्गत तक्रार निवार समितीने केले होते रांगोळी स्पर्धेच्या बक्षीस वितरणानी कार्यक्रमाची सांगता झाली. महीला सप्ताह ही नवीन संकल्पना यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी प्राचार्य अरविंद निकम, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी आयोजकांचे अभिनंदन केले.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!