बारामती मध्ये फोटो फेअर संपन्न

फोटो फेअर 2022 च्या प्रसंगी  बारामती  फोटोग्राफर असोसिएशन व शिवम लॅब चे प्रतिनिधी (छायाचित्र: किरण कुंभार)

बारामती: प्रतिनिधी 
बारामती तालुका फोटो ग्राफर असोसिएशन,शिवम  डिजिटल फोटो लॅब  यांच्या सयूंक्त विद्यामानाने रविवार दि. ६ मार्च रोजी फोटो फेअर २०२२ चे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी ज्येष्ठ फोटोग्राफर गंगाधर काळे,शाम शिंदे,योगेश दुर्गे,मामा गोरे,चाचा इनामदार आणि फोटोग्राफर असोसिएशनचे चे अध्यक्ष मल्लिकार्जुन हिरेमठ, शिवम डिजिटल कलर  लॅब चे संचालक महेंद्र मांडगे व विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि असोसिएशनचे प्रतिनिधी व  बारामती तालुक्यातील सर्व फोटोग्राफर, सोलापूर,नगर,सातारा व पुणे जिल्ह्यातील फोटोग्राफर संघटना प्रतिनिधी  मोठ्या संख्येने उपस्तीत होते.
फोटोग्राफी व व्हिडीओ क्षेत्रातील अद्यावत तंत्रज्ञान,कॅमेरे,तज्ञ मान्यवरांची कार्यशाळा,विविध कंपन्या  ची उत्पादने ,लॅब क्षेत्रातील अलबम,प्रिंटींग ,एल एडी फ्रेम आदी 
माहिती व ऑफर्स आदी सर्व माहिती एकाच छताखाली ग्रामीण फोटो ग्राफर क्षेत्रातील तरुणांना मिळावी वेळ व पैसा वाचवा  म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे शिवम डिजिटल कलर लॅब चे संचालक महेंद्र मांडगे यांनी सांगितले.

मोठ्या शहरातील फोटोग्राफी व व्हिडीओ क्षेत्रातील सर्व माहिती  विविध  कंपन्यांच्या माध्यमातून वस्तू आणि सेवा सहज उपलब्ध होणे साठी व फोटोग्राफर च्या माध्यमातून ग्राहकांना अद्यावत तंत्रज्ञान चे  फोटो,अलबम व इतर साहित्य  सहज उपलब्ध व्हावे  म्हणून  बारामती तालुक्यातील फोटोग्राफर साठी सदर कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे अध्यक्ष मल्लिकार्जुन हिरेमठ यांनी सांगितले.
या वेळी या क्षेत्रातील अद्यावत तंत्रज्ञान बाबत  मान्यवरांनी कार्यशाळा मध्ये मार्गदर्शन केले.
उत्कृष्ट फोटो सादरीकरण करणाऱ्या व  फेअर मध्ये सहभागी होणाऱ्या फोटोग्राफर ला प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले तर उपस्तीत प्रत्येकाचे स्वागत फोटो ग्राफर असोसिएशन च्या वतीने करण्यात आले.सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार महेंद्र मांडगे यांनी मानले 
 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!