बारामती दि.6 :
विद्या प्रतिष्ठान मधील माजी विद्यार्थ्यांनी मराठी माध्यमिक शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांची संघटना स्थापन
करून सामाजिक बांधिलकी व रक्ताचा तुडवडा जाणवत असल्याने प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत रविवार 06 मार्च रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या विश्वस्त व बारामती टेक्स्टाईलच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अशोक प्रभुणे ,सचिव ॲड. निलिमा गुजर, सदस्य डॉ. राजीव शहा, सदस्य किरण गुजर,व विशाल कोरे
विद्या प्रतिष्ठान मराठी माध्यमिक शाळेचे मा. मुख्याध्यापक रामचंद्र शिंदे, उपमुख्याध्यापक अर्जुन हिवरकर, पर्यवेक्षिका संगीता साठे, पर्यवेक्षक प्रकाश यादव तसेच माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सुरज चौधर, प्रकाश कोरे, यशवंत चांदगुडे, सौ. रत्ना पाटील, सौ. स्वाती मलगुंडे आदी मान्यवर उपस्तीत होते.
विद्या प्रतिष्ठान चे खजिनदार युगेंद्र पवार यांच्या संकल्पनेतून सदर माजी संघटना ची निर्मिती करण्यात आली.
सदर उपक्रमाचे कौतुक करून सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा उत्तम मार्ग म्हणजे रक्तदान होय असेही सुनेत्रा पवार यांनी सांगितले.
माजी विद्यार्थी संघटनेचे सुरज चौधर, कु. ऋतुजा पागळे, कु. आफरीन खान, विशाल जगताप, अनिल चौधर, किशोर सावंत, शरद चौधर, राहुल सोन्ने, अमर घाडगे, सौ. मंजू यादव, सुनील चौधर, धीरज चौधर, सचिन चौधर यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन केले होते . या शिबिरामध्ये 275 जणांनी रक्तदान करून सामाजिक कार्यास हातभार लावला. आभार सूरज चौधर यांनी मानले