जिल्हा बहुजन शिक्षक संघ यांच्यावतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार *फलटण एज्युकेशन सोसायटीच्या मुख्याध्यापीका प्रज्ञा अनंत काकडे यांना प्रदान

फलटण दि. 5:

अचल निष्ठेने ज्ञानाचे पवित्र, भव्य रचनात्मक कार्य केल्याबद्दल, उच्चतम ध्येय ,नीती पूर्ण आचरण,सखोल ज्ञान यामुळे विद्यार्थ्यांनसाठी कायम एक दिपस्तंभ म्हणून ध्येयासक्त कार्य प्रणालीने समाजातील विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी आयुष्य वेचून आपल्या शैक्षणिक व सामाजिक उत्तुंग कार्याप्रती कॄतज्ञता म्हणून सातारा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रांतील शिक्षणाच्या प्रसारासाठी व गुणवत्तावाढीसाठी निरपेक्ष पणे अविरत कार्य केल्याबद्दल तसेच समर्थ अध्यापणामूळे अनेक विद्यार्थी यशस्वी होण्यासाठी मदत केल्याबद्दल शिक्षक म्हणून केलेल्या सेवेच्या सन्मानार्थ शिवजन्मोत्सवानिमित्त महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव व शिक्षण परिषद मध्ये सातारा जिल्हा बहुजन शिक्षक संघ यांच्यावतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार फलटण एज्युकेशन सोसायटीच्या स्व. शीलदेवी शरदकुमार दोशी प्राथमिक विद्यामंदिर, कोळकीच्या वरिष्ठ मुख्याध्यापक *सौ. प्रज्ञा अनंत काकडे यांना कराड येथील कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला
सदर प्रसंगी प्रसिद्ध व्याख्याते श्रीमंत कोकाटे सर, शिक्षणाधिकारी मा.धनंजय चोपडे साहेब व सर्व तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!