फलटण दि. ५ :
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्रीमंत छञपती महाराणी सईबाई महाराज महिला कुस्ती प्रशिक्षण केंद्र, मुधोजी महाविद्यालय , फलटण येथे जिल्हास्तरीय महिला कुस्ती स्पर्धा व विजयमाला महिला पुरस्कार सोहळ्याचे आयोजन मंगळवार दि. ८ मार्च २०२२ रोजी करण्यात आले आहे. जागतिक महिला दिनानिमित्त उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना मुधोजी महाविद्यालयातर्फे श्रीमंत अनंतमालादेवी विजयसिंहराजे नाईक निंबाळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विजयमाला महिला पुरस्कार जाहीर करण्यात आला असून त्यामध्ये सौ. मधुबाला दिलीपसिंह भोसले अध्यक्षा, स्वयंसिद्धा उद्योग समूह , छाया दगडू बोबडे, कोळकी व सौ. शालन नाना येळे, अध्यक्षा, महिला बचत गट, काळज यांचा समावेश आहे. या पुरस्काराचे वितरण फलटण नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्षा मा. सौ. नीता मिलिंद नेवसे यांच्या शुभ हस्ते वितरित करण्यात येणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर माजी अध्यक्ष , जिल्हा परिषद सातारा हे उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डाँ. पी. एच. कदम यांनी दिली आहे . कुस्ती स्पर्धेमध्ये मँटवरील कुस्ती स्पर्धा वयोगट – 14 वर्षाखालील मुली
वजनगट – 30kg ,36 kg ,42 kg
प्रथम क्रमांक – द्वितीय क्रमांक ,
वयोगट – 17 वर्षाखालील मुली
वजनगट – 40kg ,43 kg ,49kg
प्रथम क्रमांक – द्वितीय क्रमांक वयोगट – 19 वर्षाखालील मुली
वजनगट – 50kg ,55 kg ,59kg
प्रथम क्रमांक -द्वितीय क्रमांक या पद्धतीने होणार आहे . वरील वयोगटातील आणि वजन गटातील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना रोख बक्षीस ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तरी सदरच्या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील महिला खेळाडूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे.