बारामती दि :
तालुक्यातील बऱ्हाणपूर येथे शिवजयंती निमित्त खास महिला व मुलींसाठी आयोजित प्रश्न मंजुषा,विविध खेळ,उखाणे,गाणी या वर आधारित होम मिनिस्टर कोण होणार स्पर्धे मध्ये वर्षा जगताप विजेत्या ठरल्या
शिवजयंती निमित्त सज्जनगड ते बऱ्हाणपूर शिवज्योत आणण्याऱ्या शीवप्रेमींचा सन्मान,खास पालखी मधून मिरवणूक आदी कार्यक्रमाचे आयोजन या वेळी करण्यात आले.प्रथम क्रमांक वर्षा जगताप,द्वितीय वैशाली जगताप त्रितीय पूजा चांदगुंडे आदी होम मिनिस्टर च्या विजेत्या ठरल्या तर उखाणे,प्रश्न मंजुषा मधील विजेत्यांना रोपटे देऊन सन्मानित करण्यात आले.
भैरवनाथ तरुण मंडळ चे अध्यक्ष अक्षय चांदगुडे,उपाध्यक्ष नितीन चांदगुडे,ऋषिकेश चांदगुडे,प्रतीक चांदगुडे,अमोल चांदगुडे,शुभम चांदगुडे,चारुदत्त चांदगुडे,पप्पू चांदगुडे,,विशाल चांदगुडे व जिजाऊ भवन चे व्यवस्थापक अमोल चांदगुडे आदी मान्यवर उपस्तीत होते या वेळी सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले गायन सलीम सय्यद तर मिमक्री सादरीकरण बाळासो बनसोडे यांनी केले.