कळसुबाई शिखर वयाच्या सातव्या कु.स्वरा योगेश भागवत या चिमुकलीने 1तास 56 मिनिटात कमी वेळात सर केले. दि. 18 फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर जवळील कठीण असणारा हरीहर गड ट्रेक करून दुसर्याच्या दिवशी कु.स्वरा योगेश भागवत ने
शिवजयंतीच्या निमित्ताने 1९ फेब्रुवारी2022 रोजी हा विक्रम स्वराने सायं 6 वा.1 मिनिटांनी शिखर सर करण्यासाठी सुरूवात केली व 7 वाजुन 57 मि. हे शिखर १तास ५६मिनिटात सर केले.कुमारी स्वराने वयाच्या ७ व्या वर्षी केलेल्या विक्रमाबद्दल महाराष्ट्राचे अन्न व पुरवठा मंत्री ना.छगनराव भुजबळ यांनी सन्मान केला. याबद्दल कु.स्वरा भागवत चे सर्वत्र कौतुक होत आहे.कळसुबाई शिखराची उंची ही १हजार ४६ मीटर आहे.हे शिखर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे. महाराष्ट्रातील सर्वात उंच कळसुबाई शिखर सर करणारी स्वरा भागवत ही सर्वात लहान मुलगी आहे. .तिने यापूर्वी १०तासात १४३कि.मी . सायकलिंग सहाव्या वर्षी विक्रम केला तर ५० प्रकारच्या दोरीवरील उड्या,१मिनिटात १०० पुश्यप काढने आदी विक्रमाची ‘इंडिया बुक ऑफ द रेकॉर्ड’ने नोंद घेतली आहे.