फलटण श्रीराम विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी चेअरमनपदी श्री.शिरीष माणिकराव पवार व्हा.चेअरमनपदी श्री.सुभाष दिनकरराव भोसले यांची बिनविरोध फेर निवड..

      फलटण दि.२१ : फलटण श्रीराम विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी मर्यादित, फलटण या संस्थेच्या चेअरमनपदी श्री.शिरीष माणिकराव पवार, व्हा.चेअरमनपदी श्री.सुभाष दिनकरराव भोसले यांची बिनविरोध फेर निवड करण्यात आली आहे.
      या संस्थेची संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली असून संचालकपदी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), श्री.प्रमोद आनंदराव खलाटे, श्री.उदयसिंह भाऊसाहेब जाधव, श्री.शंतनू कमलाकांत भोंसले-पाटील, श्री.शिरीष माणिकराव पवार, श्री.सुभाष दिनकरराव भोसले, अँड.विजयराव भिकोबा नेवसे, श्री.शाम शिवाजीराव कापसे, सौ.सोनाली शरद जाधव, सौ.निलम विजयकुमार लोंढे-पाटील, श्री.प्रकाश बबनराव भोंगळे, श्री.संजय यशवंत चोरमले, श्री.सुनिल आबाजी अहिवळे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

      नवनिर्वाचित संचालक मंडळ पहिल्या बैठकीत वरीलप्रमाणे चेअरमन व व्हा.चेअरमन निवड बिनविरोध करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी भारती भावेकर मॅडम यांनी काम पाहिले त्यांना पिसे मॅडम, सोसायटी सचिव श्री.शरद डांगे, लेखनिक श्री.विठ्ठल हुंबे, कर्मचारी श्री.दिलीप भंडलकर यांनी सहकार्य केले.
      नवनिर्वाचित चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालकांचे महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब), आमदार दिपकराव चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समिती चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर (बाबा),  सातारा जिल्हा परिषद मा.अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), जिल्हा परिषद सदस्या श्रीमंत सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर (वहिणीसाहेब), पंचायत समिती सभापती श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर (बाबा) यांनी अभिनंदन केले आहे.
      राजघराण्यातील अलीकडच्या तिसऱ्या पिढीने सक्रिय राजकारणास महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर (महाराजसाहेब) यांच्या नेतृत्वाखाली सन १९९१ मध्ये सुरुवात केली, त्यावेळी सन १९२६ मध्ये स्थापन झालेल्या, शताब्दीकडे वाटचाल सुरु असलेल्या फलटण श्रीराम विविध कार्यकारी सेवा सोसायटीत परिवर्तन घडवून आणण्याचा चंगच नव्याने उभारी घेणाऱ्या राजे गटाच्या कार्यकर्त्यांनी बांधला आणि त्याची सुरुवात श्रीमंत रामराजे (महाराजसाहेब), श्रीमंत रघुनाथराजे (बाबा), श्रीमंत संजीवराजे (बाबा) यांनी मा.आमदार स्व.श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांचे आशिर्वाद घेऊन केली. या संस्थेच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूकीत राजे गटाने सक्रीय सहभागी होवून आपले उमेदवार उभे केले, त्यामध्ये श्रीमंत संजीवराजे (बाबा) यांचा समावेश होता. राजे गटाच्या श्रीराम पॅनलने मोठ्या मताधिक्याने ही निवडणूक जिंकली आणि श्रीमंत संजीवराजे (बाबा) या संस्थेचे चेअरमन झाले, अवघ्या ५ वर्षात त्यांनी संस्थेची आर्थिक स्थिती बदलली आणि टप्प्याटप्प्याने संस्था आर्थिक निकषांवर उत्तम संस्था बनली, तेंव्हा पासून आजअखेर गेली ३० वर्षे ही संस्था राजे गटाकडे असून उत्तम आर्थिक स्थिती, सतत अधिक कर्ज पुरवठा, वसुलीत आघाडी घेऊन कार्यरत आहे.
      त्यानंतरच्या गेल्या २५/३० वर्षात लोकांनी एकेक संस्था राजे गटाकडे विश्वासाने सुपूर्द केल्या, नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, श्रीराम सहकारी साखर कारखाना, कृषी उत्पन्न बाजार समिती, फलटण तालुका सहकारी दूध पुरवठा संघ, तालुक्यातील ग्रामपंचायती, विकास सोसायट्या आणि विधानसभा निवडणूकीतही फलटणकरांनी राजे गटाला आपले मानून त्यांचे उमेदवार विजयी केले.
      त्यामुळे धोम-बलकवडी, नीरा-देवघर ही दोन धरणे उभी राहिली, नदी नाल्यांवर बंधारे, पाझर तलाव उभे राहिल्याने पूर्वी केवळ ३५ गावे बागायती असलेल्या फलटण तालुक्यात आता सर्व गावात पाटबंधारे व विहिरींचे पाणी पोहोचले असून तालुका आगामी काळात १००% बागायत होणार आहे.
      औद्योगिक वसाहत उभारणी, नागरी सुविधांचा विस्तार, दर्जेदार शैक्षणिक सुविधा, तरुणांना नोकऱ्या व उद्योग व्यवसायाच्या संधी उपलब्ध करुन देण्यात राजे गट यशस्वी झाला असून या सर्वांची सुरुवात फलटण श्रीराम विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी पासून  झाली असल्याने या सोसायटीला वेगळे महत्व प्राप्त झाले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!