बारामती येथील क्रीडा शिक्षकाने केला सुर्यनामस्काराचा नवीन विक्रम

सचिन नाळे यांचा सत्कार करताना बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महाडिक साहेब व पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर साहेब व इतर

बारामती दि 8 :

रथसप्तमी चे औचित्य साधून 8 फेब्रुवारी रोजी बारामती येथील जनहित प्रतिष्ठान बारामती आयोजित अखंड सूर्यनमस्कार चे आयोजन करण्यात आले होते यावेळी या उपक्रमामध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत न थांबता सुर्यनमस्कार मंत्रासह प्रत्येक स्थितीमध्ये 3 सेकंद थांबून सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत अखंडपणे 1008 सूर्यनमस्कार पूर्ण करून युवकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये आरोग्याविषयी व व्यायामा विषयी जागरुकता व आवड निर्माण करण्याचे काम केल्याबद्दल व आगळ वेेेेगळा विक्रम केल्या बद्दल बारामती शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महाडिक व पोलीस उपनिरीक्षक निंबाळकर यांच्या हस्ते बारामती येथील जनहित विद्यालायचे क्रीडा प्रशिक्षक सचिन सुभाष नाळे सर यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला व त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या या प्रसंगी जनहित विधालयाचे शिक्षक व बारामती शहर पोलिस स्टेशनचे कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!