सातारा: शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत क्रीडा प्रबोधिनी प्रवेशाबाबत महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याकरिता राज्यात प्रतिभावंत खेळाडूंची निवड करुन
शास्त्रोक्त प्रशिक्षण, शिक्षण, भोजन, निवास, अद्ययावत क्रीडा सुविधा, क्रीडा प्रबोधिनीच्या अंतर्गत देण्यात येत
आहेत. राज्यातील विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये १९ वर्षाच्या आतील खेळाडूंना सरळ सेवा प्रवेश व खेळ निहाय
कौशल्य चाचण्यांद्वारे निवासी तसेच अनिवासी प्रवेश देण्यात येणार आहे.
तरी इच्छुक सातारा जिल्ह्यातील मैदानी, आर्चरी, ज्युदो, हॅण्डबॉल, बॉक्सिंग, बॅडमिंटन, शूटिंग, कुस्ती, हॉकी,
टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, जिम्नॅस्टिक या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तर प्राविण्य व सहभाग
घेतलेल्या १९ वर्षा आतील खेळाडूंनी आपले विहित नमुण्यातील अर्ज दिनांक १५ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत जिल्हा क्रीडा
अधिखारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे सादर करावेत असे आवाहन श्री.
युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केलेले आहे. तसेच अधिक माहितीसाठी श्री. अनिल सातव,
क्रीडा मार्गदर्शक, ९६२३९४५३७१, श्री. महेश खुटाळे, क्रीडा मार्गदर्शक, ९४२२६०३४११ व श्री. दत्तात्रय माने, क्रीडा
मार्गदर्शक, ८८८८८५१६२२ यांच्याशी संपर्क साधावा.