फलटण :- फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ,राहुरी मान्यताप्राप्त श्रीमंत
शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय फलटण येथे दि .0५ .0२ . २०२२ रोजी आय सी आय सी आय बँक यांचा कॅम्पस इंटरव्हयु संपन्न झाला .आय सी आय सी आय बँक यांच्या वतीने रिलेशनशिप मॅनेजर या पदासाठी कॅम्पस इंटरव्हयु आयोजीत केला होता . या मुलाखतीस महाविद्यालयाच्या ८६ विद्यार्थानी सहभाग घेतला . आय सी आय सी आय बँक यांच्या वतीने सहाय्यक व्यवस्थापक मयुरी मोरे,अनुष्का जोशी व सुशांत चव्हाण यांनी विद्यार्थाच्या मुलाखती घेतल्या .
या कॅम्पस इंटरव्हयु चे आयोजन श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषिमहाविद्यालय फलटणच्या कॅम्पस प्लेसमेन्ट सेल या विभागा मार्फत केले गेले . कॅम्पस प्लेसमेन्ट सेल या विभागा अंतर्गत महाविद्यालयाच्या विद्यार्थासाठी नोकरीच्या संधी उपल्बध केल्या जातात
व त्या बाबतीत मार्गदर्शन केले जाते. या कॅम्पस प्लेसमेन्ट सेल विभागासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . एस . डी . निंबाळकर सर व प्रा . अभिमन्यू घनवट यांचे मोलाचे मार्गदर्शन या विद्यार्थ्यांना लाभले .
.
Its great work did by college campus. आता अग्रिकॉस म्हणजे बेरोजगार असं कुणाला वाटणार नाही.