ना.श्रीमंत रामराजेंवर टिका करुन आपले दुकान चालू ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न : प्रितसिंह खानविलकर

ना.श्रीमंत रामराजेंवर टिका करुन आपले दुकान चालू ठेवण्याचा केविलवाणा प्रयत्न : प्रितसिंह खानविलकर
फलटण । ‘‘ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी दुष्काळी जनतेच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी घेतलेले कष्ट उभ्या महाराष्ट्राला माहित आहेत. सत्तेसाठी एका पक्षातून दुसर्‍या पक्षात उड्या घेणार्‍यांना आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ना.श्रीमंत रामराजे यांच्यावर टिका करण्याशिवाय दुसरा उद्योग नाही. आपले दुकान चालू ठेवण्यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे,’’ अशी टिका राजे गट्टाचे कट्टर समर्थक, युवा कार्यकर्ते प्रितसिंह खानविलकर यांनी केली आहे.
माणचे आमदार जयकुमार गोरे यांनी माण तालुक्यातील एका कार्यक्रमात विधान परिषदेचे सभापती ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर टिका केली होती. सदर टिकेला ना.श्रीमंत रामराजे यांनी स्वत: व्हॉटस्अप ग्रुपवर प्रतिक्रिया देऊन उत्तर दिले होते. या प्रतिक्रिये पाठोपाठ फलटण तालुक्यातील राजे गटाच्या कार्यकर्त्यांनीही ना.श्रीमंत रामराजे यांच्या समर्थनार्थ आक्रमक प्रतिक्रिया दिल्या आहेत. 
आपल्या प्रतिक्रियेत प्रितसिंह खानविलकर पुढे म्हणाले की, ‘‘ना.श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सुरुवातीपासूनच एखादे मोठे पद मिळवून त्यात धन्यता मानत न बसता आपल्या प्रदेशाच्या विकासासाठी राजकीय नेतृत्त्वाने कायम कसे आग्रही रहायचे असते याचा आदर्श घालून दिला आहे. परिसरात एम.आय.डी.सी. च्या माध्यमातून रोजगार संधी निर्माण करुन देण्याबरोबरच कृष्णा खोरे, उरमोडी, तारळी, जिहे कटापूर या सिंचन प्रकल्पांच्या यशस्वीतेत ना.श्रीमंत रामराजे यांचे निर्विवाद योगदान आहे. ना.श्रीमंत रामराजे यांनी कृष्णा लवादाचे पाणी वाचवल्यामुळेच माण तालुक्याचा दुष्काळ कमी झाला आहे. फलटण तालुक्याचा दुष्काळ संपूर्णपणे हटवण्यात ना.श्रीमंत रामराजे यांना यश आले आहे. पाणी प्रश्‍नावर ना.श्रीमंत रामराजे यांनी केलेल्या कामामुळे दुष्काळी जनतेच्या आयुष्यात घडलेले परिवर्तन अशा निरर्थक टिकांमुळे अजिबात झाकले जाणार नाही हे विरोधकांनी कायम लक्षात ठेवावे’’, असेही प्रितसिंह खानविलकर यांनी नमूद केले आहे.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!