सातारा जिल्ह्यात तसेच फलटण तालुक्यात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे शिवाय करूनाचाच नवा व्हेरिएंट असलेला *ओमिक्रॉनचे* रूग्ण देखील आढळून येत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे करोना रोगापासून संरक्षण व्हावे म्हणून *मुधोजी कनिष्ठ महाविद्यालयात सोमवार दि.17/1/2022* रोजी *शासन निर्णयानुसार करोना -19 चे नियम पाळून* लसीकरण् मोहिम यशस्वी रित्या राबविण्यात आली .
वाढती करुणा
रुग्णसंख्या व पुढे येणाऱ्या बोर्ड परीक्षा व इतर परीक्षा या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग व इतर सर्वच विभाग सतर्क होताना दिसून येत आहेत व यावर वेगवेगळी
उपाययोजनांची अंमलबजावणी करताना दिसून येत आहे यामुळे *100% लसीकरण करण्यावर भर* दिला जात आहे.
याचाच एक भाग म्हणून *मुधोजी कनिष्ठ महाविद्यालय मध्ये* इयत्ता अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची लसीकरण मोहीम *सोमवार दिनांक 17/1/ 2022* रोजी महाविद्यालयाचे *प्र. प्राचार्य डॉ. कदम सर*, *उपप्राचार्य प्रा. ठोंबरे सर* यांच्या मार्गदर्शनाखाली व *आरोग्य विभाग* व *राष्ट्रीय सेवा योजना (कनिष्ठ विभाग)* यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
लसीकरण मोहिम यशस्वी होण्यासाठी *राष्ट्रीय सेवा योजनेचे* प्रकल्प अधिकारी प्रा. गवळी सर , सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रा. देशमुख मॅडम , एन.सी.सी. विभागाचे प्रा. लेफ्टनंट धुमाळ सर , लेफ्टनंट शिंदे मॅडम , प्रसिद्धी विभाग प्रमुख मोरे सर , विज्ञान विभाग प्रमुख जगदाळे सर , *सर्व वर्गशिक्षक* व *सर्व स्टाफ* यांनी विशेष कष्ट घेतले.
यावेळी आरोग्य विभागाचे कर्मचारी, उपप्राचार्य प्रा. ठोंबरे सर , आर्टस , कॉमर्स, सायन्स चा सर्व स्टाफ व विद्यार्थी करोना-19 चे सर्व नियम पाळून उपस्थित होते.