जळोची:
हरित व स्वच्छ व पर्यावरण पूरक बारामती साठी ‘बारामती इंडस्ट्रीज ‘ चे सचिन कुलकर्णी व परिवाराचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
देसाई इस्टेट ते माळावरची देवी मंदिर येथे नगरपरिषद च्या माध्यमातून वृषारोपन करण्यात आले त्याची पाहणी करताना अजित पवार यांनी कौतुक केले .
शहरातील नीरा डावा कालवा चे सुशोभीकरण त्याच ठिकाणी भरावमध्ये झाडे लावण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती
त्या वेळी नगरपरिषद च्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून
एमआयडीसी येथील बारामती इंडस्ट्रीज प्रा ली चे संचालक सचिन कुलकर्णी व मित्र परिवाराच्या वतीने नगरपालिकेस महोगनी जातीचे व इतर विविध 5 फूट उंचीचे वृक्ष देण्यात आले
अजित पवार यांनी सचिन कुलकर्णी मिञपरिवाराच्या कार्याचे कैतुक केले.
यावेळी नगराध्यक्ष पौर्णिमा तावरे गटनेते सचिन सातव नगरसेवक अतुल बालगुडे , दीपक मलगुंडे, संदीप पाटील, नानासाहेब साळवे,गणेश भोसले, अभिजीत शेळके व अविनाश सूर्यवंशी,सुजित जाधव उपस्थित होते.
सचिन कुलकर्णी यांनी स्वच्छ सुंदर व पर्यावरण पूरक बारामती साठी या पूर्वी एमआयडीसी व तालुक्यात विविध उपक्रम राबविले आहेत त्याच प्रमाणे कडक उन्हाळ्यात वन्य जीवांना वनीकरण हद्दीतील सर्व पाणवठ्यात मोफत टँकरने पाणी पुरवठा केला जातो