जळोची:
पिंपळी लिमटेक येथील कलावंत बाळासाहेब बनसोडे यांना रविवार 02 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बारामती शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला.
15 नोव्हेंबर 2021 रोजी बारामती तालुक्यातील पिंपळी लिमटेक या गावातील महिला सौ शिलाबाई इंगोले या 50 फुट खोल विहिरीत पडल्या होत्या . त्या महिलेस वाचवण्यासाठी बनसोडे यांनी विहिरीमध्ये उडी घेऊन महिलेचे प्राण वाचवले होते. या कामगिरी बदल बारामतीचे माजी नगराध्यक्ष सुभाष सोमाणी यांनी स्मृतिचिन्ह शाल श्रीफळ व रोख दहा हजार रुपयाचे स्वरुपात जाहीर केला होता. बारामती शौर्य पुरस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी डॉ शशांक जळक,डॉ आशिष जळक पिंपंळी च्या
सरपंच मंगला हरिभाऊ केसकर, छत्रपती कारखान्याचे संचालक संतोष ढवाण पाटील आदी मान्यवर
उपस्तीत होते.
फोटो ओळ: बाळासाहेब बनसोडे यांना पुरस्कार देताना उपमुख्यमंत्री अजित पवार व शेजारी डॉ आशिष जळक