संकल्प फौंडेशन च्या वतीने विविध उपक्रम

जळोची :

प्रसिद्ध कुस्ती पट्टू 
कै ओम कानगुडे यांच्या स्मरणार्थ संकल्प फौंडेशन बारामती  च्या वतीने मिशन बॉईज हायस्कुल येथील 
अनाथ मुलांना  कपडे व ब्लॅंकेट चे  वाटप करण्यात आले या प्रसंगी आंतरराष्ट्रीय बॉडी बिल्डर ,हवालदार जळगाव  पोलीस   रवि  वंजारी यांच्या हस्ते सदर वाटप करण्यात आले .
  बारामती संकल्प फाउंडेशन चे अध्यक्ष अनिकेत पवार,प्रशांत भागवत आशिष डोईफोडे , जोतिबा कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
थंडी च्या दिवसात मुलांना ऊब देणारे कपडे मिळावेत म्हणून स्वेटर व ब्लॅंकेट वाटप करून सामाजिक बांधीलकी जोपासणे कौतुकास्पद असल्याचे रवी वंजारी यांनी सांगितले तर आभार प्रशांत भागवत यांनी मानले 
फोटो ओळ: संकल्प फौंडेशन च्या वतीने साहित्य वाटप करताना मान्यवर 
—————————–
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!