फलटण. :
सांगवी ता.फलटण. ऊस उत्पादनाचा एकरी शंभर मे. टनांचा टप्पा गाठण्यासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे माजी वनस्पती शरीरक्रिया शास्त्रज्ञ, डॉ.बाळकृष्ण जमदग्नि यांनी विकसीत केलेले सुपर केन नर्सरी तंत्र फायदेशीर ठरेल असे उपविभागीय कृषि अधिकारी, भास्करराव कोळेकर यांनी सांगीतले.
सांगवी ता.फलटण येथे प्रगतीशील शेतकरी शंकर नाना फडतरे यांच्या शेतावर महाराष्ट्र शासन कृषि विभागाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या सुपर केन नर्सरी तंत्र ऊस रोपवाटीका पाहणी कार्यक्रम प्रसंगी कोळेकर बोलत होते.
यावेळी मंडळ कृषि अधिकारी,अमोल सपकाळ कृषि पर्यवेक्षक अंकुश इंगळे, नीरज कुमार बोडके, तंत्र सहाय्यक नजीब झारी, प्रगतशील शेतकरी सुरेश जगताप, रामचंद्र मोरे,दत्तात्रय घोरपडे, दिलीप सपकाळ, गायकवाड गुरुजी,महादेव बेलदार,संदिप फडतरे, दिपक फडतरे, राजेंद्र फडतरे,दिनेश मोरे,वसंत डांगे आदि उपस्थीत होते.
ते पुढे म्हणाले की, सुपर केन नर्सरी तंत्राचा अवलंब केल्यास अतीशय कमी खर्चात निरोगी, सशक्त व जोमदार ऊस रोपे तयार करता येतात. तसेच जलद उगवण होऊन तान सहनशीलता वाढते,जीवाणू संवर्धन बेने प्रक्रिया सहज करता येते व रोपे कणखर होऊन वाहतुकीस सोईस्कर ठरत असल्याने ऊस उत्पादकांनी ऊस रोपे निर्मितीसाठी या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर अवलंब करावा व अधिकाधीक ऊस उत्पादन घ्यावे.
कार्यक्रमाचे आयोजन कृषि सहाय्यक योगेश भोंगळे यांनी केले.यावेळी परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी उपस्थीत होते.