वाठार निंबाळकर :
वाठार निंबाळकर आयोजित चॅम्पियन ट्रॉफी 2021 क्रिकेट स्पर्धा बक्षीस वितरण प्रसंगी उपस्थित असलेले सातारा जिल्हा परिषदेचे मा.अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा)यांना आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर यांचे वतीने कोविंड योद्धा मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी फलटण तालुक्याचे युवा नेतृत्व व पंचायत समितीचे विद्यमान सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर, वाठार निंबाळकर गाव तंटामुक्तीचे अध्यक्ष श्री.नंदूभाऊ नाळे, मा.जितेंद्रकुमार नाईक निंबाळकर, मा.सरपंच अशोकराव निंबाळकर,राजीव नाईक-निंबाळकर, विद्यमान सरपंच सौ.शारदा भोईटे, उपसरपंच सौ.आनंदीबाई तरटे, डॉ.रवींद्र बिचुकले इ.उपस्थित होते.
फलटण तालुक्यामध्ये गेली दोन वर्ष कोरोनाजन्य परिस्थिती अतिशय बिकट असताना तसेच श्रीमंत संजीवराजे (बाबा) स्वतः या कोरोना परिस्थितीतून गेलेले असतानाही त्यांनी फलटण तालुक्यातील परिस्थिती अतिशय उत्कृष्टरित्या हाताळलेली आपणा सर्वांना ज्ञात आहे. आज फलटण तालुक्यातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आलेली असताना संपूर्ण फलटणकर यांच्या वतीने आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर यांचेमार्फत कोविड योद्धा मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
*कोविंड योद्धा मानपत्र*
इतिहासाचे साक्षीदार आणि आम्हा फलटण नगरीचे तारणहार आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय बाबा श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांना मानाचा मुजरा….
माझ्या जीवनाचा रथ,
मी प्रजेसाठी हाकणार,
तुझ्यापुढे रे कोरोना,
नाही आता झुकणार!!
या उक्तीप्रमाणे इतिहासाची परंपरा असलेली आपली फलटणची माती या मातीतल्या माणसांसाठी स्वतःचे जीवन समर्पित करणारे आपले लाडके राजे स्वतःच्या जीवावर कोरोनाची लढाई बेतलेली असतानाही रणांगणावर हतबल न होता धुरंधर,शूरवीर, लढवैय्या म्हणून आपल्या प्रजेसाठी झटणारे बाबा यांचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे.
संघर्षाची नेहमीच दोन हात करून आयुष्याला आव्हान देऊन फलटण वासियांचे पितृत्व घेऊन वडिलांच्या मायेने काळजी घेणारे सिंहासारखे राजे आणि पित्याचा ओलावा कर्तृत्वातआणि दातृत्वात सामावलेले बाबा.
प्रजेसाठी जगणार,
प्रजेसाठी झिजणार,
येऊ दे कितीही संकटे,
मागे नाही हटणार
हेच आपल्या कार्याचे मर्म जाणून आम्हासाठी सदैव कार्यतत्पर असणार्या राज्यांसाठी हे मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येत आहे. आपले आयुष्य आनंदी आणि निरोगी जावो हीच प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना व आपल्या लाडक्या राजाला आई प्रतिष्ठान वाठार निंबाळकर संस्थेच्या वतीने त्रिवार वंदन.