मुंबई दि. 18 ( फलटण टुडे वृत्तसेवा ) :
शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पुढील वर्षी घेण्यात येणार्या दहावीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावे, असे आवाहन केले आहे. 18 नोव्हेंबरपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध असेल, अशी माहिती त्यांनी दिली.
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2022 मध्ये घेण्यात येणार्या इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट होऊ इच्छिणार्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे आवेदनपत्र 18 नोव्हेंबरपासून आभासी पद्धतीने घेतले जातील. शिक्षण मंडळाने परिपत्रक काढत माहिती दिली. 18 नोव्हेंबर म्हणजेच उद्यापासून नियमित शुल्कासह अर्ज भरायला सुरुवात होणार आहे.