आसू ( प्रतिनिधी फलटण टुडे ) दि. 18 :
फलटण तालुक्यातील आसू येथील सदन व शेतकरी कुटुंबातील कु. वैष्णवी विठ्ठल फाळके हिची आफ्रिका येथे पुढील महिन्यात होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेत ज्युनियर हॉकीसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. त्याबद्दल फाळके कुटुंबासह वैष्णवीचे फलटण तालुका आणि जिल्ह्यातून स्वागत होत आहे.
भारतीय महिला संघ डिसेंबर २०१९ मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांच्याविरुद्ध तिरिंगी मालिकेत राष्ट्रांच्या स्पर्धेत खेळला होता, त्यांनतर मार्चपर्यंत कोरोनाचा विषाणू वेगाने पसरल्यामुळे संपूर्ण क्रीडा क्षेत्रही लॉकडाऊन होते, त्यानंतर अमेरिकेतील चिली या ठिकाणी ज्युनिअर संघाबरोबर १७ आणि १८ जानेवारीला तर वरिष्ठ महिला संघाबरोबर २०, २१, २२ आणि २३ तारखेला असे सहा ही सामान्यांमध्ये विजयी मिळवला आहे.
फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील आसू येथील वैष्णवी फाळके हिचे शिक्षण आसू येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले असून इयत्ता दुसरीमध्ये शिक्षण घेत असताना सातारमध्ये हॉकी स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. यावेळी वैष्णवीची बालेवाडी या ठिकाणी निवड करण्यात आली होती. त्यानंतर तिने बॉलीवूडमध्ये जिने हॉकी हा गेम निवडून महाराष्ट्र संघाकडून अंडर १६ खेळली. नंतर वैष्णवीने दहावीसाठी यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटण या ठिकाणी प्रवेश घेतला. दरम्यान डिसेंबर २०१९ मध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड यांच्याविरुद्ध तिरिंगी मालिकेत भारतीय हॉकी संघ राष्ट्रांच्या स्पर्धेत खेळला होता, त्यानंतर अमेरिकेतील चिली याठिकाणी ज्युनियर हॉकी संघामध्ये चांगल्या पद्धतीने खेळी करून विजयी खेचून आणत भारताला हॉकीमध्ये विजयी मिळून दिला. त्यामुळे फलटण तालुक्यातील या लेकीची कामगिरी कौतुकास्पद आहे.