विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये 'प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा' ( वर्ष २०वे )

बारामती दि. १८ :
विद्या प्रतिष्ठानच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभागाच्यावतीने मा. शरदचंद्रजी पवारसाहेब व सौ. प्रतिभाताई पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रविवार, दि. १२ डिसेंबर २०२१ व सोमवार, दि. १३ डिसेंबर २०२१ रोजी ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धे’चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे हे २० वे वर्ष आहे. या स्पर्धेची प्राथमिक फेरी ऑनलाइन पद्धतीने मराठी भाषेतूनच होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या वेबसाईटवर गुगल फॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे. तो भरून  स्पर्धेमधील आपला सहभाग नोंदवता येईल. गुगल फॉर्म बरोबर महाविद्यालयाच्या मा. प्राचार्यांचे पत्र, विद्यार्थ्याचे ओळख पत्र व फोटो जोडावा.

रविवार, दि. १२ डिसेंबर २०२१ रोजी कनिष्ठ विभागाची व सोमवार, दि १३डिसेंबर २०२१ रोजी वरिष्ठ विभागाची वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येईल. याबाबत सविस्तर माहिती महाविद्यालयाच्या वेबसाईटवर वेळोवेळी दिली जाईल. या स्पर्धेसाठी ६+२=८ मिनिटे वेळ देण्यात आला असून वरिष्ठ विभागासाठी रू.११०००, रू. ७०००, रू.३००० व रू.१००० आणि कनिष्ठ विभागासाठी रू.१००००, रु.५०००, रू.२०००, रू.१००० अशी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिके ठेवण्यात आलेली आहेत. दोन्ही विभागांसाठी सांघिक स्तरावर स्वतंत्र ‘प्रतिभा सन्मानचिन्ह’ देण्यात येणार आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत शिंदे व संयोजन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. श्रीराम गडकर यांनी दिली. 

बारामतीची ‘प्रतिभा आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा’ ही अखिल महाराष्ट्रात वक्तृत्वाचा मानदंड म्हणून नावारुपास आलेली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाविद्यालयीन विद्यार्थी या गाजलेल्या स्पर्धेत सहभागी होत असतात. 

या स्पर्धेच्या कनिष्ठ विभागासाठी  
१.समाजमाध्यमांच्या विळख्यात अडकलेली तरुणाई
२. मोबाईल : माझी शाळा पण धोके टाळा
३. शेतकर्‍यांची दैन्यावस्था व पेटलेली आंदोलने
४. कोरोना योद्ध्यांचे योगदान
५. वाचन आणि जीवनमूल्ये

वरिष्ठ विभागासाठी 
१. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव 
२. आपत्ती व्यवस्थापन व शरदचंद्रजी पवारसाहेब 
३. साहित्यातील गोंदण :  शांता शेळके 
४. कोरोना : दृश्य-अदृश्य परिणाम 
५. काळ स्पर्धापरीक्षांचा पण बेभरवशाचा

स्पर्धकांना महत्त्वाच्या  सूचना –
 1. स्पर्धकांनी 25 नोव्हेंबर, 2021 पर्यंत आमच्या वेबसाईटवरील Google form वर नोंदणी करावी.
2.  स्पर्धकांनी 25 नोव्हेंबर, 2021 पर्यंत Google form वर आपला 5 मिनिटांचा भाषणाचा Video Upload करावा.   Google Form for Registration – https://forms.gle/8PbKSNwGKGS467Cv5
3. बुधवार, दि. 1 डिसेंबर 2021 रोजी स्पर्धकांचे आलेले व्हिडिओ पाहून, त्यांचे परीक्षण करून, छाननी करून … निवडक स्पर्धकांना … कनिष्ठ विभागाच्या (निवडक) स्पर्धकांना रविवार, दि. 12 डिसेंबर 2021 रोजी व वरिष्ठ विभागाच्या (निवडक) स्पर्धकांना सोमवार, दि. 13 डिसेंबर 2021 रोजी … त्यावेळची परिस्थिती पाहून, कोरोनासंदर्भातील शासकीय नियमांचे पालन करून …ऑफलाईन अथवा ऑनलाईन… आपले वक्तृत्व सादर करावे लागेल. 
4.  महाराष्ट्रातील कोणत्याही महाविद्यालयातील कनिष्ठ, वरिष्ठ, पदव्युत्तर आणि पदविका या विभागातील विद्यार्थी स्पर्धक  म्हणून या स्पर्धेत सहभागी होऊ शकतील.
5. प्रत्येक महाविद्यालयास कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांचा स्वतंत्र संघ पाठविता येईल. संघातील स्पर्धकांना स्वतंत्र विषयावर बोलावे लागेल.
6.  स्पर्धक महाविद्यालयाचा अधिकृत विद्यार्थी असावा. त्यासाठी मा. प्राचार्यांचे सहभागाबाबतचे पत्र व स्वत:चे ओळखपत्र [email protected] या मेलवर पाठवावे.
7. अंतिम फेरीतील प्रत्येक स्पर्धकास 6+2 = 8 मिनिटे वेळ दिला जाईल. वेळेचे बंधन अनिवार्य आहे.
8.  यावर्षीची ‘प्रतिभा’ आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा विनाशुल्क घेण्यात येईल.


अधिक माहितीसाठी महाविद्यालयाची वेबसाईट vpasccollege.edu.in  पाहावी किंवा मराठी विभाग प्रमुख डॉ. आनंदा गांगुर्डे (8149142453), कार्याध्यक्ष डॉ. श्रीराम गडकर (9764850035 ), संयोजन समितीचे  सदस्य प्रा. सुनील डिसले (9960248517), प्रा. नंदकुमार खळदकर (8975062897), प्रा. शिवाजी टकले (9860993219) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाच्यावतीने करण्यात येत आहे.

Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!