फलटण तालुक्यातील सहकार क्षेत्रात आसू नंबर एक विविध कार्यकारी सहकारी सोसायटी शताब्दी वर्षात पदार्पण करत आहे सलग शंभर वर्ष बिनविरोध निवडणूक होत आहे नुकतीच जाहीर झालेल्या पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध करून सहकार क्षेत्रात बिनविरोध चा पॅटर्न मार्गदर्शक ठरेल असे मत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी व्यक्त केले
नुकतीच आसू नंबर एक विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चे निवडणूक बिनविरोध झाली आहे या सोसायटीची स्थापना 3 मार्च 1926 रोजी झाली असून या संस्थेला महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण किसन वीर श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर खासदार शरदचंद्रजी पवार साहेब श्रीमंत दादाराजे खर्डेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे सध्या ही संस्था संपूर्ण संगणकीकृत असून तिची वार्षिक उलाढाल दहा कोटी आहे संस्थेची सभासद संख्या 1085 असून संस्थेमार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात त्याचबरोबर विविध प्रकारची कर्जप्रकरणे दिली जातात चालू वर्षात संस्थेने सात कोटी 54 लाख 51 हजार रुपयांची मध्यम मुदत कर्ज वाटप केले असून संस्थेचा वार्षिक नफा पन्नास लाख रुपये आहे तसेच संस्थेने सभासदांच्या हितासाठी 15 टक्के लाभांश वाटपाची परंपरा जपली आहे या संस्थेकडे एकूण 82 महिला बचत गट असून त्यांना आतापर्यंत तीन लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिले आहे तसेच बचत गटांना पंचायत समिती अनुदानाचा लाभ मिळवून दिला आहे संस्थेने वेळोवेळी बदल केले आहेत सतत संस्था वर्ग ऑडिटमध्ये आहे या संस्थेच्या बिनविरोध निवडणुकीसाठी संस्थेच्या सभासदांनी योग्य सहकार्य केले आहे संस्थेच्या सभासदांनी केलेली मदत ही शतकमहोत्सवी वर्षात सहकार क्षेत्रात आगळावेगळा ठसा उमटवणारे ठरले असल्याचे मत पंचायत समितीचे सभापती श्रीमती शिवरुपराजे खर्डेकर यांनी व्यक्त केले
नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये सर्वसाधारण गटातून आनंदा बाळू पवार, किरण महादेव घाडगे, आप्पासो भगवान फाळके, पैलवान राहुल हरिचंद्र ढवळे, दीपक अर्जुन सकुंडे, नारायण बुवाजी शेंडे ,सुभाष युवराज येतकाळे, जाकीर हुसेन इस्माईल शेख, महिला प्रतिनिधी शकुंतला रामदास माने ,कांताबाई दिलीप घोरपडे भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्गातून सदाशिव बाबुराव गोसावी व इतर मागासवर्ग प्रवर्ग तुन जगन्नाथ नाथा ताम्हाणे अनुसूचित जाती प्रवर्गातून अशोक पवार हे बिनविरोध संचालक निवडून आले आहेत नवनिर्वाचित संचालकांचे उद्योजक बंटीराजे खर्डेकर शिवरूपराजे खर्डेकर धिरेंद्रराजे खर्डेकर भाजप नेते विशालसिंह माने पाटील सातारा जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन प्रमोद झांबरे आसू गावचे सरपंच महादेवराव सकुंडे तसेच विविध गावचे पदाधिकाऱ्यांनी शतक महोत्सवी वर्षातील बिनविरोध संचालकांचे अभिनंदन केले आहे