बारामती :
शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध, कुक्कुटपालन सारखा मत्स्य व्यवसाय व मत्स्यखाद्य पुरविणे हा व्यवसाय देखील अर्थ व्यवस्था बळकट करणारा व महत्वाचा असल्याचे प्रतिपादन शरयू फौंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी केले.
तांबोळी अॅक्वाकल्चर सर्व्हिसेस च्या उदघाटन प्रसंगी शर्मिला पवार मार्गदर्शन करीत होत्या या प्रसंगी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, करण खलाटे, राहुल वाबळे, शिवाजी काळे, अनिल काटे, गुरुप्रसाद आगवणे, संग्राम मोकाशी, फिरोज बागवान, संगीता पाटोळे, शारदा खराडे, पूनम कांबळे, रफिक तांबोळी व ग्रोवेल फिश फिड्स कंपनीचे जयप्रकाश तिवारी, गणेश दाभोळकर, ऋषिकेश पालवे आणि तांबोळी अक्वॉकल्चरल सर्व्हिसेसचे संस्थापक फिरोज तांबोळी, अहमद तांबोळी, निसार तांबोळी आदी मान्यवर उपस्थित होते.
“मत्स्यखाद्य व मत्स्य व्यवसाय वाढीसाठी शासन सुद्धा तरुणांना सहकार्य करीत आहे इंदापूर बारामती फलटण परिसरमध्ये वाढते शेततळी व मत्स्यव्यवसाय मुळे मत्स्यखाद्य विक्री ही काळाची गरज असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
मत्स्यबीज, मत्स्यखाद्य ,औषधे मिळण्यासाठी मोठ्या शहरात न जाता बारामती मध्ये त्याच किमती मध्ये उपलब्ध होणार असल्याचे ग्रोवेल फिश फिड्स कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
या वेळी मान्यवरांचे स्वागत जहांगीर तांबोळी यांनी केले तर आभार सिमरन तांबोळी यांनी मानले.
सुत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले
फोटो ओळ: उदघाटन करताना शर्मिला पवार,दत्तात्र्य भरणे व इतर