जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
शहरातील देसाई इस्टेट प्रभागात राष्ट्रवादी युवक शाखा च्या माध्यमातून मतदार नोंदणी व जनकल्याण योजना अभियान साठी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
रविवार 14 नोव्हेंबर रोजी मतदार नोंदणी व जनकल्याण योजना अभियान चा शुभारंभ
बारामती सहकारी बँक चे उपाध्यक्ष अविनाश लगड, तालुका क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे,अनिल सातव, उद्योजक सुरेश पवार, उद्योजक कल्याणराव पाटील, नगरसेवक अतुल बालगुडे ,कराटे पटू रवींद्र कराळे,अभिमन्यू इंगुले न्यू युवा शिवक्रांती चे अध्यक्ष हेमंत भाऊ नवसारे,शाखा अध्यक्ष युवराज गजाकस ,संग्राम खंडागळे,आकाश काटे,अनिल खंडाळे,राहुल वायसे,अमोल जाधव आदी मान्यवर उपस्तीत होते.
मतदार नोंदणी,ईश्रम कार्ड,हेल्थ कार्ड,यिनिव्हर्सल वास (लसीचे दोन डोस पूर्ण झालेले असेल तर) पेन्शन धारक साठी हयाती चा दाखला, आधार कार्ड आदी सर्व सेवा एकाच वेळी उपलब्ध करून देत असल्याने नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला असल्याचे आयोजक हेमंत नवसारे व युवराज गजाकस यांनी सांगितले.
या वेळी आभार संग्राम खांडागळे यांनी मानले.