बारामती मध्ये किल्ले स्पर्धेला प्रतिसाद

विजेत्या विद्यार्थ्यांना बरोबर मान्यवर
 बारामती (फलटण टुडे वृत्तसेवा ) :
 बारामती कला क्रीडा फाउंडेशन च्या वतीने  किल्ले बनवा स्पर्धा साठी विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
 किल्ले बनवा स्पर्धेत सुमारे 45 स्पर्धकांनी सहभाग घेतला. परीक्षण श् मनोज कुंभार, विनोद खटके व डॉ.निखिल लोंढे यांनी केले . यामध्ये स्पर्धकांनी विविध कल्पना राबवून अनेक किल्ल्यांच्या हुबेहूब प्रतिकृती बनवल्या होत्या स्पर्धकांना बनवलेल्या किल्ल्याविषयी प्रश्न देखील विचारण्यात आले. 
    महाराष्ट्राच्या मातीसाठी लढलेल्या शूरांचा इतिहास जागवला पाहिजे तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणले पाहिजे असे मत  प्रशांत भागवत यांनी मांडले. सह्याद्री हा महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व भौगोलिक दृष्टीने किती महत्वाचा आहे तसेच किल्ल्यांचे संवर्धन यावर डॉ.दिलीप लोंढे मार्गदर्शन केले या स्पर्धेत प्रथम – शिवराज विलास परकाळे द्वितीय- अभिनव प्रदीप सूर्यवंशी तृतीय-आर्यन धाडवे 
उत्तेजनार्थ-  इरा सचिन जगताप
जय दत्त पवार अंजली दादासो साळुंखे वेदांत प्रशांत नलगे
कृष्णाई लॉन्स कराटे क्लास
सावंत विश्व कराटे क्लास
देवळे पार्क कराटे क्लास
बारामती अर्बन कराटे क्लास 
    इत्यादींनी यश संपादन केले.
 रविवार दि.14/11/2021 रोजी बालदिनाचे औचित्य साधून पारितोषिक वितरण समारंभ कृष्णाई लॉन्स बारामती येथे पार पडला.कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध कुस्ती निवेदक  प्रशांत भागवत उपस्थित होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती कला क्रीडा फाउंडेशन चे अध्यक्ष श्री दिलीप लोंढे होते. श्री चंद्रकांत सावंत यांचे सहकार्याने झालेल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विनोद खटके यांनी केले तर आभार श्री दिपक मोरे यांनी मानले 

 
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!