जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा :
मंगळवार १६ नोव्हेंबर २०२१ रोजी त्रिवेणी कट्टा उपक्रम संपन्न झाला .महिलांच्या कला गुणांना वाव मिळावा व उद्योजिका महिलांसाठी हा उपक्रम त्रिवेणी उद्योग समहू च्या संचालिका सौ शुभांगी चौधर यांच्या मार्फत खास महिलेसाठी सुरू करण्यात आला आहे
या वेळी प्रज्ञा ढोले ,राजश्री आगम ,स्नेहा गाढवे ,सरिता मुथा, स्मिता शहा ,आनंदी निबंधे,योगिता पाटील ,आशा शिरतोडे ,डॉक्टर मीनाक्षी देवकाते ,तृप्ती पारेख ,सुंदर घोळवे ,सरोज पिसे ,या विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांनी सहभाग घेऊन शिक्षणापासून ते व्यवसाईक,उद्योजक होई पर्यंत चे सुख दुःख देणारे अनुभव कथन केले व एकमेकींना व्यवसाया साठी शुभेच्छा दिल्या
प्रत्येक महिलेला माहेरी आल्याचा एक प्रकारचा अनोखा अनुभव नेहमी त्रिवेणी कट्ट्या मध्ये येत राहिला आहे अशाच प्रकारे अनेक कट्टे भरविले जाणार आहेत व खुप महिलांना संधी भेटनार आहे व्यवसायात येणाऱ्या महिलांना नवं नवीन अनुभव मिळावेत व आत्मविश्वास मिळावा नवीन व्यवसाईक,उद्योजिका तयार होणे साठी व महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे म्हणून सदर कार्यक्रमाचे आयोजन करीत असल्याचे त्रिवेणी उद्योग समूहाच्या संचालिका शुभांगी चौधर यांनी सांगितले.