कर्जमुक्ती योजना : पश्चिम महाराष्ट्रातील १०२८२ तर सातारा जिल्ह्यातील ७५४ शेतकरी यांचा यामध्ये समावेश
म्हसवड दि १२ (प्रतिनिधी)
: महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेंतर्गत आधार प्रमाणिकरणासाठी १५ नोव्हेंबरची अंतिम मुदत देण्यात आली आहे. अंतिम मुदतीचे चार दिवस शिल्लक असतानाही अद्याप ७८ हजारावर शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केलेले नाही. निर्धारित वेळेत आधार प्रमाणिकरण न करणारे शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची भीती आहे. विशेष म्हणजे राज्यातील सर्वधिक १० हजार शेतकरी हे औरंगाबाद जिल्ह्यातील आहेत. तर पश्चिम महाराष्ट्रातील १०२८२ तर सातारा जिल्ह्यातील ७५४ शेतकरी यांचा समावेश यामध्ये आहे.
कोरोनामुळे रखडलेली कर्जमुक्ती योजना पूर्णत्वास नेण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. कर्जमुक्ती योजनेच्या पोर्टलवर विशिष्ट क्रमांकासह नावे आलेली असतानाही अद्याप असंख्य शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केलेले नाही. अशा शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण करून घेण्यासाठी १५ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत विशेष मोहीम राबविली जात आहे. योजनेची अंतिम मुदत चार दिवसांवर आलेली असताना राज्यभरातील तब्बल ७८ हजारावर शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणिकरण केलेले नाही. औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वाधिक दहा हजार ८५५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण रखडले आहे.
यासाेबतच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा-७५४,सांगली-९७७,कोल्हापूर-६२५,सोलापूर-१०९९, पुणे-१५८९ तर नगर जिल्ह्यातील ५२३८ शेतकऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील ६०४१० शेतकऱ्यांना ३९१.७४ कोटी एवढी कर्ज माफी होणार आहे पैकी ५९६५६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले असून त्याना ३८७.०९ कोटी इतकी कर्ज माफी मिळणार आहे तर उर्वरित ७५४ शेतकरी अद्याप आधार प्रमाणिकरणापासून दूर असून त्यांची कर्ज माफीची रक्कम ४.६५ कोटी इतकी आहे.
सांगली जिल्ह्यातील ८३१८० शेतकऱ्यांना ४९५.७९ कोटी एवढी कर्ज माफी होणार आहे पैकी ८२२०३ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले असून त्याना ४९३.५९ कोटी इतकी कर्ज माफी मिळणार आहे तर उर्वरित ९७७ शेतकरी अद्याप आधार प्रमाणिकरणापासून दूर असून त्यांची कर्ज माफीची रक्कम २.२१ कोटी इतकी आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील ४८९११ शेतकऱ्यांना २९८.५८ कोटी एवढी कर्ज माफी होणार आहे पैकी ४८२८६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले असून त्याना २९५.३८ कोटी इतकी कर्ज माफी मिळणार आहे तर उर्वरित ६२५ शेतकरी अद्याप आधार प्रमाणिकरणापासून दूर असून त्यांची कर्ज माफीची रक्कम ३.२० कोटी इतकी आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ७४६८३ शेतकऱ्यांना ६७९.४९ कोटी एवढी कर्ज माफी होणार आहे पैकी ७३५८४ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले असून त्याना ६६९.७८ कोटी इतकी कर्ज माफी मिळणार आहे तर उर्वरित १०९९ शेतकरी अद्याप आधार प्रमाणिकरणापासून दूर असून त्यांची कर्ज माफीची रक्कम ९.७१ कोटी इतकी आहे.
पुणे जिल्ह्यातील १४१७३५ शेतकऱ्यांना १०५५.९० कोटी एवढी कर्ज माफी होणार आहे पैकी १४०१४६ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले असून त्याना १०४९.१९ कोटी इतकी कर्ज माफी मिळणार आहे तर उर्वरित १५८९ शेतकरी अद्याप आधार प्रमाणिकरणापासून दूर असून त्यांची कर्ज माफीची रक्कम ६.७१ कोटी इतकी आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील २९५९८५ शेतकऱ्यांना १८११.६८ कोटी एवढी कर्ज माफी होणार आहे पैकी २९०७४७ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले असून त्याना १७९९.७० कोटी इतकी कर्ज माफी मिळणार आहे तर उर्वरित ५२३८ शेतकरी अद्याप आधार प्रमाणिकरणापासून दूर असून त्यांची कर्ज माफीची रक्कम ११.९८ कोटी इतकी आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील एकूण ७०४९०४ शेतकऱ्यांना ४७३३.१८ कोटी एवढी कर्ज माफी होणार आहे पैकी ६९४६२२ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण केले असून त्याना ४६९४.७३ कोटी इतकी कर्ज माफी मिळणार आहे तर उर्वरित १०२८२ शेतकरी अद्याप आधार प्रमाणिकरणापासून दूर असून त्यांची कर्ज माफीची रक्कम ३८.४६ कोटी इतकी आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक म्हणजे ५२३८ शेतकरी आधार प्रमाणिकरणापासून दूर आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील ५२३८, अकोला- २५७२, अमरावती- ४१७८, बीड- ५२८१, भंडारा- ९६०, बुलडाणा- ४८९८, चंद्रपूर- ९५५, धुळे- ७९८, गडचिरोली- २५४, गोंदिया- ४०६, हिंगोली- २९११, जळगाव- १८९०, जालना- ४१६४, काेल्हापूर- ६२५, लातूर- १७०५, नागपूर- ९१५, नांदेड- ६२४६, नंदूरबार- २१३, नाशिक- ८७२, उस्मानाबाद- १९२९, पालघर- ८६, परभणी- ६०९१, पुणे- १५८९, रायगड- ३८४, रत्नागिरी- १६४८, सांगली- ९७७, सातारा- ७५४, सिंधूदुर्ग- २३९, सोलापूर- १०९९, ठाणे- ३९, वर्धा- १५८७, वाशिम- १२६८ व यवतमाळ जिल्ह्यातील ५१८९ शेतकऱ्यांनी अद्याप आधार प्रमाणिकरण केलेले नाही. संबंधित शेतकऱ्यांनी १५ नाेव्हेंबर पूर्वी आधार प्रमाणिकरण करून घेणे गरजेचे आहे. मुदतीत आधार प्रमाणिकरण न करणाऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांना शासनाच्या कर्जमुक्ती योजनेपासून वंचित रहावे लागणार आहे.
मराठवाड्यातील ३९ हजार शेतकरी
राज्यातील ७८ हजार शेतकऱ्यांमध्ये मराठवाड्यातीलच तब्बल ३९ हजार १८२ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण रखडले आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यातील १० हजार ८५५, बीड- ५२८१, हिंगोली- २९११, जालना- ४१६४, लातूर- १७०५, नांदेड- ६२४६, उस्मानाबाद- १९२९, परभणी जिल्ह्यातील ६०९१ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण रखडले आहे.
तर ४११ कोटींचे नुकसान
आधार प्रमाणिकरणापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांनी १५ नोव्हेंबर पर्यंत आधार प्रमाणिकरण करून घेणे गरजेचे आहे. संबंधित शेतकऱ्यांनी आधार प्रमाणिकरण वेळेत केले नाही तर त्यांचे ४११ काेटी रूपयांचे कर्ज माफ होणार नाही. किंबहुना यात त्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचे चित्र आहे.