गोविंद मिल्क अँण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा.लि.फलटण व शंकर मार्केट व्यापारी युवक मंडळ, फलटण यांचे संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्ड पुरस्कृत विश्वविक्रम विजेता नितीन गवळी यांच्या गप्पा, गाणी, नृत्य, विनोद, कविता, नकला या सर्वांनी परिपूर्ण असणारा व नवनविन खेळांसाठी सज्ज असणारा ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरचा कार्यक्रम मंगळवार, दि. १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५:३० ते ८:३० या वेळेत मुधोजी प्राथमिक विद्यामंदिर (शंकर मार्केट, फलटण) च्या प्रांगणात पार पडणार असून नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक तथा शंकर मार्केट व्यापारी युवक मंडळाचे प्रमुख किशोरसिंह नाईक निंबाळकर व नगरसेविका सौ.प्रगतीताई कापसे यांनी केले आहे.