जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
बारामती औद्योगिक विकास महामंडळ चे कार्यकारी अभियंता संजय जोशी यांचा सेवानिवृत्ती बदल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते (शुक्रवार 15 ऑक्टोबर) सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,गटनेते सचिन सातव ,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष संभाजी होळकर,
दादासो कांबळे,तहसीलदार विजय पाटील, तालुका वैदकीय अधिकारी डॉ मनोज खोमणे,बारामती इंड्रस्टियल मनुफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार,सर्व उद्योजक विविध कंपन्यांचे अधिकारी,कामगार उपस्तीत होते.
बारामती एमआयडीसी मधील विविध रस्ते,पथदिवे, पाणीपुरवठा ,व जॅकवेल च्या माध्यमातून विविध कंपन्यांना वेळेत पाणी पुरवठा करण्यासाठी संजय जोशी यांचे कार्य उल्लेखनीय असून उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतल्याचे सांगून अजित पवार यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले.
संजय जोशी यांनी सातारा,पुणे,औरंगाबाद,बारामती येथे उप अभियंता म्हणून या पूर्वी काम केले असून 37 वर्षाच्या सेवे मध्ये उद्योजक यांना जास्तीजास्त सेवा देताना एमआयडीसी कामगार यांचे सुद्धा प्रश्न सोडविले आहेत.
एमआयडीसी कामगार युनियन च्या वतीने सुद्धा या वेळी सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर सुदर्शन चौधर यांनी आभार मानले .
——————————————–