बारामती: फलटण टुडे वृत्तसेवा
खास दसऱ्याच्या औचित्य साधून सीमोल्लंघन फक्त पुरुषांनी न करता आधुनिक महिलांनी सुद्धा केले पाहिजे महिलांनी विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे म्हणून विविध क्षेत्रातील महिलांचा सन्मान व महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन अंजनगाव येथे करण्यात आले होते.
होम मिनिस्टर आयोजित खेळ रंगला वहिनींचा बाळासाहेब बनसोडे प्रस्तुत
प्रथम क्रमांक सौ,निर्मला विजय मारकड पैठणी स्वराज्य फर्निचर सुरेश परकाळे व तंटामुक्ती अध्यक्ष विलास परकाळे यांच्या वतीने ,दुतीय बक्षीस सौ सारिका दादासो कुचेकर टेबल फॅन सौ सविता बाळासाहेब परकाळे सरपंच यांच्या वतीने, तृतीय बक्षीस सौ, कावेरी वैभव मोटे कुकर सौ छाया दादासो मोरे यांच्या वतीने, बक्षीस देण्यात आले.
या प्रसंगी प्रदिप दादा वायसे , दिलीप परकाळे , उद्योजक हनुमंत मामा वायसे, सुभाष आबा परकाळे, सत्यवान कुचेकर, बाळासाहेब कुचेकर, अरविंद परकाळे, शंकर मोटे, बंडू कुचेकर, प्रशांत कुचेकर आदी मान्यवर उपस्तीत होते आभार प्रदर्शन अंजनगाव चे तंटामुक्ती उपाध्यक्ष दादासाहेब कुचेकर यांनी केले