बी डी गायकवाड यांना पदवी प्रदान करताना मान्यवर
जळोची: फलटण टुडे वृत्तसेवा
सोशल वर्क साहित्य व उद्योजक या क्षेत्रात बी.डी. गायकवाड यांना चेन्नई विद्यापिठाच्या ”युनिव्हर्सल डेव्हलपमेंट कॉन्सील” च्या वतीने ”डॉक्टरेट” ही पदवी प्रदान करण्यात आली. समाजसेवा आणि व्यवसाय या विषयावर त्यांचा प्रबंध होता. पद्विदान समारंभ चेन्नई विद्यापिठ होसूर या ठिकाणी संपन्न झाला प्रसंगी विद्यापिठाचे प्रेसिडेंट डॉ.के. प्रभाकरण, ”युनिव्हर्सल डेव्हलपमेंट कॉन्सिल” चे चेअरमन, डॉ.सि.पॉल एबनेझर,डॉ.के.ए.मनोहरन, आमदार डॉ.जे. हरिदास ,आमदार डॉ. शशिहविन ,डॉ.रविचंद्रन,श्री.श्री.स्वामीजी ईत्यादि मान्यवर उपस्थित होते. ग्रामिन भागातील कलाकारांसाठी विविध उपक्रम, शिवाय समाज प्रबोधन केल्याबद्दल श्री. बी.डी. गायकवाड यांचा उल्लेखनिय कार्य लक्षात घेता चेन्नई विद्यापिठाच्या ”युनिव्हर्सल डेव्हलपमेंट कॉन्सिलच्या” वतीने ही पदवी प्रदान करण्यात आली.