बारामती: (फलटण टुडे वृत्तसेवा )
सर्व सामान्य परिस्थिती असताना सुद्धा जिद्द चिकाटी व आत्मविश्वास च्या जोरावर घाडगे बंधू यांनी व्यवसायात उतरून यश मिळवले आहे हे कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले भिगवन रोड वरील मोता प्याराडाएज इमारती मधील ‘अतुल शु मार्ट’ च्या दसरा निमित्त (शुक्रवार 15 ऑक्टोबर 2021 ) सदिच्छा भेट प्रसंगी अजित पवार यांनी गौरउद्गार काढले या प्रसंगी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे,उद्योजक सतीश किर्दक ,वालचंदनगर इंड्रस्टीज चे सेवा निवृत्त अधिकारी दामोदर घाडगे,शंभूराज हॉटेल चे संचालक नवनाथ घाडगे,संघवी पार्क मालक संघटना चे सुरेश देवकाते व पत्रकार अनिल सावळेपाटील उपस्तीत होते.
व्यवसायात सातत्य ठेवा,उधारी देऊ नका,बाजारपेठ चा बारकाईने अभ्यास करत बदल करा असाही सल्ला अजित पवार यांनी दिला
अजित पवार यांचा सत्कार अविनाश व अतुल घाडगे यांनी केला.