सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या गावामध्ये विनापरवाना बैलगाडा शर्यतीचा डाव फलटण ग्रामीण पोलीसांनी लावला उधळून


फलटण प्रतिनिधी :-

सातारा आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या फलटण तालुका हद्दीत येणाऱ्या राजुरी गावामध्ये विनापरवाना बैलगाडा शर्यतीचा डाव आखला असल्याचे चित्र दिसून आल्यानंतर फलटण ग्रामीण पोलीसांना माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी कारवाई करत बैलगाडा शर्यतीचा डाव उदवस्त केला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आणि सोलापूर जिल्ह्याच्या नातेपुते पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मध्यभागी राजुरी गावामध्ये दर रविवारी बैलगाडा शर्यत व जुगाराचे नियोजन केले जात असल्याची माहिती पोलीसांनी मिळाली होती. त्यानंतर त्या ठिकाणी जाऊन ग्रामीण पोलीसांनी पहाणी केली परंतु त्याठिकाणी कोणत्याही प्रकारच्या बैलगाड्या, बैल आढळून आले नाहीत मात्र, बैलगाडा शर्यतीसाठी तयार करण्यात आलेले मैदान (ट्रॅक) आढळून आले असता हे शर्यतीचे मैदान जेसीबीच्या साह्याने उध्वस्त करत त्या ठिकाणी जागोजागी मोठे खड्डे पाडून त्यामध्ये जुनाट बाभळी आणि इतर काटेरी झाडे टाकण्यात आली. त्यामुळे पुन्हा त्या ठिकाणी बैलगाडा शर्यत भरणार नाहीत अशी माहिती ग्रामीण पोलीसांनी दिली असून अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.
Share a post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!